चौथ्या टप्प्यातील मतदानावर अवकाळी पावसाचे सावट..! ‘या’ मतदार संघात मुसळधार पावसाचा इशारा.
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
- प्रतीनीधी : कल्पेश राणे :- लोकसभा निवडणुकीच्या चौ थ्या टप्प्यात राज्यातील ११ मतदारसंघात आज मतदान होत आहे. या मतदानावर अवकाळी पावसाचे गडद सावट आहे. आज (१३ मे) दुपार ३ नंतर पावसाचा जोर जास्त राहण्याची शक्यता आहे.
- हवामान विभागाने पुणे, नगर, जालना आणि छत्रपती संभा जीनगर जिल्ह्याला ऑरेंज तर नंदुरबार, जळगाव आणि बीड जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.
- वरील जिल्ह्यात अवकाळी पावसासह गारपीट होण्याची शक्यता आहे. जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरूर, नगर आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघांना देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
- तर नंदुरबार, जळगाव व बीड जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांत नंदुरबार, जळगाव, रावेर, बीड लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे.
- सकाळी हवेत गारवा असल्याने तसेच तापमान कमी असण्या ची शक्यता असल्याने ज्येष्ठ नागरिकांनी सकाळच्या सत्रात मतदान करावे तर इतरांनी दुपारपर्यंत मतदान करावे असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
- दुपारी ३ नंतर ताशी ४० ते ६० किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहून पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे.
- पुढील काही दिवस पावसाचे
- हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, वातावरणातील खालच्या थरातील वाऱ्याची द्रोणीका रेषा व वारा खंडित प्रणाली आज विदर्भ मराठवाड्यावरून जात आहे.
- कोकण गोव्यात कोकण गोव्यात पुढील पाच दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्रात आज बऱ्याच तर पुढील दोन दिवस काही तर त्या पुढील दोन दिवस तुरळ क ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
- मराठवाड्यात आज आणि उद्या बऱ्याच ठिकाणी, परवा काही ठिकाणी तर त्या पुढील दिवसांत तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
- विदर्भात आज बऱ्याच उद्या उद्या व परवा काही ठिकाणी त्यापुढील दोन दिवस तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
- कोकण, गोवा, ठाणे, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील दोन ते तीन दिवस मेघगर्जना, विजांचा कडकडाट व सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.
- तर रायगड व रत्नागिरी जिल्ह्यात अनेक गर्जनेसह विजांचा कर्कडाट ३० ते ४० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्या ची शक्यता आहे.
- त्यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रात नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा सांगली या जिल्ह्यांत १३ मे रोजी मेघ गर्जना, विजांचा कडक डाट व सोसाट्याचा वाऱ्यासह गारा पडण्याची शक्यता वर्तव ण्यात आली असल्याने या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे.
- तर १३ मे नंतर दोन दिवस मेघ गर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
- धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यांना १३ मे रोजी विजांचा क डकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आलेला आहे.
- मराठवाड्यात आज नांदेड लातूर व धाराशिव या जिल्ह्यांना त र छत्रपती संभाजी नगर व जालना या जिल्ह्यात देखील वाद ळी वाऱ्यासह गारा आणि पाऊस पडण्याची शक्यता असल्या ने या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे.
- हिंगोली वगळता मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांना पुढील तीन ते चार दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता असल्याने यलो अलर्ट देण्यात आलेला आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space