नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , मौजे चुनाकोळवण माजी विद्यार्थी संघ मुंबई /ग्रामिण संस्थेच्या वतीने ग्रामीण वार्षिक कार्यक्रम – २०२४ मोठया उत्साहात साजरा. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

मौजे चुनाकोळवण माजी विद्यार्थी संघ मुंबई /ग्रामिण संस्थेच्या वतीने ग्रामीण वार्षिक कार्यक्रम – २०२४ मोठया उत्साहात साजरा.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतीनीधी : राजापूर : प्रमोद तरळ :- मौजे चुनाकोळवण मा जी विद्यार्थी संघ मुंबई व ग्रामीण संस्थेच्या वतीने प्रतिवर्षा प्रमाणे यंदाही ग्रामीण वार्षिक कार्यक्रम – २०२४ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
  • कार्यक्रमाची सुरुवात ग्राम दैवत धनी अंबिकेश्वर व आई महाकाली यांना स्मरण करून कारण्यात आली. कार्यक्रम पत्रिकेप्रमाणे सकाळी ९ वाजता श्रीसत्यनारायण महापूजा विधिवत करण्यात आली.
  • तद नंतर महिलांचे हळदी कुंकू व पैठणीचा खेळ अतिशय हर्षोल्लासात पार पडला सदर कार्यक्रमात पैठणीचा मान हा सौ पार्वती शंकर बाईत यांनी मिळविला.
  • कार्यक्रमाची रंगत भावोजीच्या भूमिकेत असलेल्या सुप्रसिद्ध शाहीर, कवी, व्याख्याते व निवेदक शाहिद खेरटकर यांनी आपल्या नेहमीच्या विनोदी तसेच हरजाबाबीपणाने वाढवली व उत्कठावर्धक केली.
  • तसेच आपल्या व्याख्यानातून त्यांनी महिलांना आजच्या जगात वावरताना त्यांचे हक्क आणि अधिकार यांची सखोल पद्धतीने जाणीव करून दिली.
  • त्याच बरोबर महिला साक्षमीकरणाचे महत्व पटवून दिले. त्यानंतर महिलांना हळदीकुंकू देऊन श्रीसत्यनारायणाच्या महापूजेचा महाप्रसाद दिला.
  • मध्यांतरात मुलांचे मैदानी खेळ घेण्यात आले. रात्रौ ९ वाजता व्यासपीठाची रचना करण्यात आली. सदर विचारमंचवार गाव प्रमुख श्री तुलजी बाबू मटकर, मुंडगा व सर्वट भात बियाण्या चे भारत सरकार कडून पेटंट प्राप्त शेतकरी सत्कार्मुर्ती श्री द यानंद चौगले साहेब, प्रमुख मार्गदर्शक गुरुवर्य दिनेशजी चौगु ले, चुनाकोळवण गावचे सरपंच श्री.श्रीकांत मटकर साहेब उप सरपंच सौ संजनाताई मटकर, धी कुणबी सहकारी बँक ली. संचालिका सौ कल्पनाताई पाटणकर, तंटामुक्ती अध्यक्ष श्री सुरेश गुरव, ग्रामपंचायत सदस्य श्री महेंद्र पांचाळ, माजी तंटा मुक्ती अध्यक्ष श्री विजय देवरुखकर, श्रीयुत शिंदे संस्था अध्यक्ष श्री रवींद्र मटकर इत्यादी मान्यवर विचारमांच्यावर उपस्थित होते.
  • मान्यवरांचे स्वागत करत विविध सत्कार करण्यात आले.कार्य क्रमाचे सूत्रसंचालन व विस्तृत प्रास्ताविक श्री दत्ताराम मट कर यांनी केले. मान्यवारांच्या यथोचित मार्गदर्शनाने आभार मानून कार्यक्रम विचार मंचाचा संपविण्यात आला.
  • रात्रौ ११ वाजता करमणूकीचा कार्यक्रम महाबळे जाधव वाडी यांचे कोकणात गाजत असलेले नमन सादर झाले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा