हिंदू-मुस्लिम, राज्यघटना या मुद्यांपासून दूर राहा; नड्डा, खर्गे यांना आयोगाची नोटीस.
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
- प्रतीनीधी : कल्पेश राणे :- जात, समूह, भाषा व धार्मिकते च्या आधारावर तसेच देशाची राज्यघटना धोक्यात असण्या सारखे मुद्दे भाजप व काँग्रेसच्या स्टार प्रचारकांनी सातत्याने मांडणे योग्य नसल्याचे मत व्यक्त करून आज केंद्रीय निवड णूक आयोगाने भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा व काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना नोटीस बजावली आहे.
- पक्षांच्या स्टार प्रचारकांकडून वारंवार या मुद्द्यावरून वक्तव्य दिले जात असल्याने सामाजिक व सांस्कृतिक वीण उसवि ण्याची शक्यता असल्याचे मत निवडणूक आयोगाने व्यक्त केले आहे.
- यापासून आपापल्या पक्षांच्या स्टार प्रचारकांना दूर ठेवण्याची जबाबदारी या दोन्ही पक्षांच्या अध्यक्षांची असल्याचे दोन वेगवेगळ्या नोटिशीत म्हटले आहे.
- राजस्थानमधील बांसवाडा येथील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंदू-मुस्लिम समाजात दुही पसरविणाऱ्या भाषणाच्या विरो धात काँग्रेसने दिलेल्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना नोटीस बजावली होती.
- जवळपास एक महिन्यानंतर निवडणूक आयोगाने भाजपने दिलेले उत्तर फेटाळून लावले. भाजपच्या स्टार प्रचारकांनी धार्मिक व जातीय आधारावर प्रचारापासून दूर राहिले पाहिजे, अशी तंबी दिली आहे.
- समाजात दुही निर्माण होईल, असे भाषणे देणे स्टार प्रचारकां नी थांबवावे, असेही निवडणूक आयोगाने भाजपला सुचविले आहे.
- काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना सुद्धा निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. काँग्रेसचे स्टार प्रचारक राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती.
- काँग्रेसने दिलेले स्पष्टीकरणही निवडणूक आयोगाने फेटाळून लावले असून काँग्रेसने संरक्षण दलाच्या मुद्द्यावरून राजका रण करू नये.
- तसेच संरक्षण दलातील सामाजिक व आर्थिक स्थितीबद्दल समाजामध्ये दुष्प्रचार करू नये, असे सुचविले आहे. राहुल गांधी यांनी अग्निवीर योजनेवरून केंद्र सरकारवर टीका केली होती.
- त्याचप्रमाणे काँग्रेस अध्यक्षांनी स्टार प्रचारक राहुल गांधी व त्यांच्या उमेदवारांनी देशाची राज्यघटना नष्ट करण्यात येईल किंवा विकल्या जाईल, असे वक्तव्य करण्यापासून दूर राहा, असे निवडणूक आयोगाने सुचविले.
- भाजप सत्तेत आल्यास राज्यघटना बदलण्यात येईल, असा मुद्दा प्रत्येक प्रचारसभेत राहुल गांधी यांच्याकडून उपस्थित केला जात आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space