नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , राज्यात दुष्काळाच्या झळा तीव्र…! दहा हजारांवर गावे, वाड्यांत दुर्भिक्ष; सरकारची डोळेझाक. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

राज्यात दुष्काळाच्या झळा तीव्र…! दहा हजारांवर गावे, वाड्यांत दुर्भिक्ष; सरकारची डोळेझाक.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतीनीधी : कल्पेश राणे :- मुंबई – राज्याला पाणीपुवरठा करणाऱ्या धरणांमध्ये केवळ २४ टक्के पाणीसाठा शिल्लक असून १० हजारांहून अधिक वाड्या, गावांना टँकरवर अवलं बून राहावे लागत आहे.
  • नागरिकांसह पशुधन पाण्याअभावी संकटात आले असून, लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जीवनमरणाचा प्रश्‍न असलेल्या दुष्काळाकडे मात्र डोळेझाक करण्यात आली.
  • सध्या मॉन्सूनपूर्व पाऊस सुरू असला तरी हा पाऊस मुरवणी चा नसल्याने पाणीसाठ्यात फारसा फरक पडत नाही. शिवा य या पावसामुळे चाऱ्याचा प्रश्‍न काही प्रमाणात सुटेल असे प्रशासनाचे म्हणणे आहे.
  • मात्र वास्तवात तसा फारसा फरक पडेल असे शेतकऱ्यांना वाटत नाही. सध्या २९३४ गावे आणि ६५३९ वाड्यांवर ३६२२ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जास्त असल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाने दिली आहे.
  • यात केवळ ९३ टँकर सरकारी तर ३५२९ खासगी टँकर्स आहेत. ज्या गावांमध्ये पाणीपुरवठा केला जात आहे तो केवळ पिण्यासाठी असून, जनावरांच्या पाण्याचे मोठे दुर्भिक्ष आहे.
  • परिणामी पशुधन संकटात आले आहे. छत्रपती संभाजीनगर, नाशिक विभागात पाण्याचे संकट अधिक गंभीर होत असून पावसाकडे सर्वांचे डाळे लागले आहेत.
  • छत्रपती संभाजीनगर विभागात तब्बल १२३६ गावे, ४९८ वा ड्या तर नाशिक विभागात ७४६ गावे आणि २५३६ वाड्या तहानल्या आहेत.
  • येथे अनुक्रमे १८१२ आणि ८०३ टँकरद्वारे पाणीपुवरठा केला जात आहे. पुणे विभागातील ३७७५ वाड्या, ६२८ गावांना ७४८ टँकरद्वारे पाणीपुवरठा सुरू आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा