
बेताल वक्तव्य करणाऱ्या गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तीव्र आंदोलन.
- प्रतिनिधी : हर्षल ठाकरे :- भारतीय जनता पक्षाचे वाचा वी आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शर दचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री जयंतराव पाटी ल तसेच त्यांच्या आई-वडिलांविषयी केलेल्या घृणास्पद व क्तव्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने जिल्हाधिकारी का र्यालयावर तीव्र आंदोलन करण्यात आले.
- या आंदोलनादरम्यान जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले.

- सदर आंदोलन धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवा र पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री.जितेंद्र मराठे यांच्या नेतृत्वाखा ली पार पडले.
- निवेदनात म्हटले आहे की, “गोपीचंद पडळकर यांची राज कीय कारकीर्द सतत वादग्रस्त राहिली आहे. ते नेहमीच बेताल वक्तव्ये, शिवराळ भाषा आणि गुंडागर्दीमुळे चर्चेत असतात.
- महाराष्ट्र ही संतांची आणि सुसंस्कृत लोकांची भूमी असून, पडळकर यांच्या वक्तव्यामुळे राज्यातील सामाजिक आणि राजकीय वातावरण दूषित झाले आहे.
- त्यामुळे त्यांच्यावर तातडीने कायदेशीर कारवाई करून आमदारकी रद्द करावी. अन्यथा भविष्यात तीव्र आंदोलन उभारले जाईल.”
- धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदा धिकारी व कार्यकर्त्यांनी आंदोलनाद्वारे मुख्यमंत्री व भाज पा वरिष्ठ नेत्यांकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे.

- याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे किसान सेल प्रदेश उपाध्यक्ष सयाजीराव ठाकरे, म.प्रदेश सरच्टनि स नरेंद्र पाटील, किसान सेल जिल्हा कार्याध्यक्ष हर्षल ठा करे शिरपूर तालुका अध्यक्ष व्यंकटेश पाटील,धुळे तालुका अध्यक्ष विनोद बच्छाव, शिंदखेडा तालुका अध्यक्ष डॉ. कै लास ठाकरे, साक्री तालुका उपाध्यक्ष रवी तोरवणे, साक्री तालुका सरचिटणीस संदीप भामरे, किसान सेल जिल्हा ध्यक्ष गुलाबराव पाटील, ओबीसी आघाडी जिल्हाध्यक्ष डॉ. कुणाल पाटील, धुळे जिल्हा सरचिटणीस पंकज सुराणा, शिक्षक आघाडी जिल्हाध्यक्ष राजेंद्र भदाने, ग्रंथालय आघा डी जिल्हाध्यक्ष दिनेश पवार, ग्राहक सेल जिल्हाध्यक्ष जग दीश बोरसे, दत्तू मुलचंद पाटील, श्री सुनील पाटील,चंद्रकां त पाटील यांच्यासह जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ते मो ठ्या संख्येने उपस्थित होते.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











