अहेरी वरून प्रवासी घेऊन अमरावती करिता निघालेल्या एसटी महामंडळच्या बसला अपघात _वाहकासह दोन महिला गंभीर.
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
- प्रतीनीधी : स्वरूप गावडे :- नेहमीप्रमाणे प्रवासी घेऊन अहेरी वरून अमरावती करिता निघालेल्या एसटी महामंडळाच्या अहेरी आगाराच्या बसला अपघात झाला आहे.
- ही घटना लगाम ते आष्टी रस्त्यावरील धनुर जवळच्या वन विभागाच्या नाक्या जवळ सकाळी 10 वाजताच्या सुमारास घडली.
- या अपघातात वाहकासह दोन महिला प्रवाशी गंभीर जखमी झाल्याने त्यांना अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविले आहे.
- प्राप्त माहितीनुसार अहेरी आगाराची एम एच-07 सी-9463 क्रमांकाची बस जवळपास 27 प्रवाशांना घेऊन सकाळी 8.30 वजता अमरावती करीता निघाली.
- अहेरी वरून वर्धा मार्गे ही बस अमरावती ला जाते. अहेरी वरून जवळपास 35 किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय महामार्गा वरील धनुर जवळच्या वनविभाग नाक्याजवळ समोरून येणा ऱ्या वाहनाला साईड देताना बाजूला खोल भाग असल्याने बस पलटली.
- या वाहनात चालक पी आर मेश्राम आणि वाहक डी एस मेश्राम होते. च्या सोबत जवळपास 27 प्रवासी या वाहनातून प्रवास करत होते.
- त्यातील वाहक डी एस मेश्राम आणि दोन महिला प्रवाशांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना रुग्णवाहिकेने अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.
- विषेश म्हणजे या बस मध्ये वाहक असलेले डी एस मेश्राम यांची मुलगी सुद्धा प्रवासी म्हणून होती. तिला सुद्धा दुखापत झाली आहे.
- या घटनेमुळे प्रवाशांमध्ये प्रचंड भीतीचा वातावरण निर्माण झाली आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकां नी एकच गर्दी केली होती. तर सदर रस्त्यावर मोठ्या प्रमाणा त रहदारी ठप्प झाली होती.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space