नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , तीव्र चक्रीवादळ ‘रेमल’ प. बंगालच्या किनाऱ्याच्या दिशेने. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

तीव्र चक्रीवादळ ‘रेमल’ प. बंगालच्या किनाऱ्याच्या दिशेने.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतीनीधी : कल्पेश राणे :- बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे रुपांतर रेमल चक्रीवादळात झाले आहे. तसेच हे वाद ळ रविवारी (२६ मे) पहाटे बांगलादेश आणि पश्चिम बंगाल च्या किनारपट्टीवर मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे घेऊन येण्याची शक्यता (Cyclone Remal) आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने (IMD) दिली आहे.
  • IMD च्या मते, चक्रीवादळ रेमाल उत्तरेकडे आणि नंतर पूर्वेकडे सरकून शनिवारी सकाळपर्यंत पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात तीव्र चक्रीवादळ बनले आहे.
  • त्यानंतर पुढे ते आणखी तीव्र होईल आणि शनिवारी रात्री पर्यंत सागर बेट (भारत) आणि खेपुपारा (बांगलादेश) दरम्या नचा किनारा ओलांडण्याची शक्यता आहे.
  • त्यानंतर हे चक्रीवादळ बांगलादेश आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीच्या दिशेने पुढे सरकणार (Cyclone Remal) असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
  • ‘रेमल’ चक्रीवादळाचा ओडिशावरही परिणाम
  • रविवारी (दि.२६) तीव्र चक्रीवादळ रेमलच्या आगमनापूर्वी पश्चिम बंगालच्या किनारी जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
  • चक्रीवादळ त्याच्यासोबत अत्यंत मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे आणेल आणि त्याचा ओडिशावरही परिणाम होण्याची शक्यता आहे, असेदेखील हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
  • वाऱ्याचा वेग ताशी 110-120 किमी ते 135 किमीपर्यंत पोहचणार हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रेमल चक्रीवादळ लँडफॉल होताना सुमारे 110-120 किलोमीटर प्रतितास (kmph) वाऱ्याचा वेग असणार आहे.
  • ते जवळपास 135 किमी प्रतितास वेगाने होचण्याचा अंदाज वर्तवला आहे. रविवार (२६ मे) आणि सोमवारी (दि.२७ मे) पश्चिम बंगाल आणि उत्तर ओडिशाच्या किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
  • तर सोमवार २७ मे ते मंगळवार २८ मे रोजी ईशान्य भारता च्या काही भागांमध्ये अतिवृष्टी (Cyclone Remal) होण्याची शक्यता देखील भारतीय हवामान विभागाने वर्तली आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा