नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , रत्नागीरी रिफायनरीला पुन्हा विरोध; संपूर्ण कोकणातून होणार उठाव होणार . – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

रत्नागीरी रिफायनरीला पुन्हा विरोध; संपूर्ण कोकणातून होणार उठाव होणार .

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • रिपोर्टर: न्यूज रूम ऑपरेटर : कोकणातली रिफायनरी रखडण्याची शक्यता पुन्हा एकदा निर्माण झाली आहे.
  • रिफायनरीला विरोध करण्यासाठी 17 गावांचा प्लान ठरला आहे. होळीनंतर एकाच दिवशी, एकाच वेळी’ आंदोलन करण्यात येणार आहे. त्यासाठी विरोधाची नवी रणनीती ठरविण्यात येत आहे.
  • तसे नियोजन करण्यासाठी सतरा गावांचे प्रतिनिधी तयारीला लागले आहेत.
  • रिफायनरी विरोधाची नवी रणनीती कोकण रिफायनरी विरोधी समितीची राजापूर येथे बैठक झाली.
  • या बैठकीत 17 गावांचे प्रतिनिधी उपस्थित होते. मार्च महिन्यात अर्थात होळीनंतर संपूर्ण कोकणात रिफायनरी विरोध दर्शवण्याचा प्लान तयार करण्यात आला आहे.
  • ‘एकाच दिवशी, एकाच वेळी रिफायनरी विरोधात रस्त्यावर उतरण्याच्या निर्णयावर बैठकीत चर्चा झाली आहे. तसे आंदोलनाचे नियोजन करण्यात आले आहे.
  • या रिफायनरीवरुन सुरुवातीला भाजप आणि शिवसेना असा संघर्ष पाहायला मिळाला होता. परंतु, राज्यातील सत्तांतराच्या नाट्यानंतर आता शिंदे गट आणि भाजपने या प्रकल्पाला पुन्हा जोर लावला आहे.
  • त्यानंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रिफायनरी बाबत महत्त्वपूर्ण घोषणा केली. राजापूर येथे  उभारण्यात येणार आहे.
  • तशा हालचाली सुरु झाल्या आहेत. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी याबाबत बैठकही घेतली. त्यांनी बारसू येथे रिफायनरी प्रकल्प होणार अशी घोषणा केली आहे.
  • ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांनीही प्रकल्पाबाबत पाठिंब्याची भूमिका घेतली आहे. बारसू रिफायनरी या प्रकल्पाचा आवाका 2 लाख कोटीचा आहे.
  • यामध्ये बांधकाम फेजमध्ये सुमारे 1 लाख लोकांना रोजगार, ऑपरेशन फेजमध्ये 3 लाख लोकांना त्यानंतर थेट रोजगार 75 हजार लोकांना मिळणार आहे, असेही यावेळी उद्योगमंत्री सामंत यांनी सांगितले.
  • तसेच कोयना धरणातून पाणी रिफायनरीसाठी वापरण्यात येणार. ज्या शहरातून गावातून ही पाईपलाईन जाईल, त्यांना देखील पाण्याचा टॅब दिला जाणार आहे पण पाणीपट्टी संबंधीत गावांनी भरायची आहे, अशी माहिती सामंत यांनी दिली होती.
  • दरम्यान, तत्कालीन मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला या प्रकल्पाबाबत एक पत्र दिले होते. त्यानुसार, 13 हजार एकर जागेचे भू संपादन बारसूमध्ये होऊ शकते.
  • पण यामध्ये सोलगाव, देवाचं गोठले, शिवणे या गावांनी याला विरोध केला होता. दरम्यान, आमदार राजन साळवी यांची मागणी होती की, ही तीन गावे या प्रकल्पात येणार नाही, ही मागणी मान्य करण्यात आली आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा  https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा