
नवरात्र उत्सवात डॉल्बी, डि.जे. व लेझर लाईट वापरास सोलापूर जिल्ह्यात प्रतिबंध – जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे आदेश.
- प्रतिनिधी : माळशिरस : शकील मुलाणी :- सोलापूर जिल्ह्यात दि. २२ सप्टेंबर २०२५ ते ०७ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत पारंपरिक पद्धतीने व उत्साहात साजरा होणाऱ्या नवरात्र उत्सवाच्या मिरवणुकांमध्ये डॉल्बी,डि.जे सिस्टीम व लेझर लाईट शोच्या वापरास प्रतिबंध घालण्या त आला आहे.
- जिल्ह्याचे जिल्हादंडाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी भार तीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३(१) अन्वये हा आदेश जारी केला आहे.

- मागील वर्षी सार्वजनिक शक्तीदेवी उत्सव मंडळ व गरबा- दांडिया आयोजक मंडळाकडून आयोजित कार्यक्रमांमध्ये डॉल्बी व डि.जे. सिस्टीममुळे काही भाविकांना कान व छा तीच्या त्रासामुळे अपंगत्व किंवा जीवितास धोका निर्माण झाल्याची प्रकरणे निदर्शनास आली होती.
- तसेच लेझर लाईटमुळे वयोवृद्ध व लहान मुलांच्या डोळ्यां ना इजा झाल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.
- या संदर्भात ज्येष्ठ नागरिक संघटनांनी निवेदन सादर केले असून, उपविभागीय अधिकारी, सोलापूर क्र. १ यांनी दि. २० सप्टेंबर २०२५ रोजीचा अहवाल सादर केला आहे.
- त्यानुसार, सार्वजनिक आरोग्य व सुरक्षिततेच्या दृष्टीने डॉ ल्बी, डि.जे. व लेझर लाईटच्या वापरास प्रतिबंध करणे आवश्यक असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
- जिल्हादंडाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आपल्या आदे शात नमूद केले आहे की, सार्वजनिक शक्तीदेवी उत्सव मंडळ व गरबा- दांडिया आयोजक मंडळाकडून आयोजि त कार्यक्रमांमध्ये व मिरवणुकांमध्ये वरील तंत्रज्ञानाचा वा पर पूर्णतः प्रतिबंधित करण्यात येत आहे.
- हा आदेश सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुके व सार्वजनि क कार्यक्रमांवर लागू राहील.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











