उत्तर सोलापूर येथे सिना नदीच्या पुराचे पाणी संपूर्ण गावात घुसले असून गावाचे संपूर्ण जनजिवन विस्कळीत.

  • प्रतिनिधी : भारत साळुंके :-डोणगाव,तालुका उत्तर सो लापूर येथे आज पहाटेच सिना नदीच्या पुराचे पाणी संपूर्ण गावात घुसले असून गावाचे संपूर्ण जनजिवन विस्कळीत झाले आहे.
  • पुराच्या पाण्याने संपूर्ण गावाला वेढा घातला असून गावा कडे येणारे रस्ते पाण्यामुळे बंद झाले आहेत. सोलापूर क डे जाणारा फक्त एकच रस्ता चालू आहे.
  • पुराच्या पाण्यात नागरिकांचे संसार उपयोगी साहित्य, घरा तील वस्तू साहित्य संपूर्ण पाण्यात बुडाले आहे.
  • गावातील लाईट चा डि.पी.देखील पाण्यात बुडाल्यामुळे संपूर्ण गावात लाईट नाहीये. बाधित नागरिकाच्या कुटुंबा ला सुरक्षित स्थळी हलवले असून त्यांना गावातील सरपंच, उप सरपंच, ग्रामविकास अधिकारी व ग्रामपंचायत सदस्य व इतर नागरिक यांच्या कडून जेवणाची सोय करण्यात आली आहे.
  • अद्याप शासकीय प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची म दत गावात पोहचली नसून गावातील तरुण मुलं नागरिकां चे स्थलांतर करीत असून त्यांची जनावरे व इतर साहित्य सुरक्षित स्थळी पोहचवण्याचे काम चालू आहे.
  • सिना नदीचे पाणी गावातील ओढ्यामार्फत गावात पोहोच ले आहे. नागरिक सदर झालेल्या नुकसानीबाबत शासना कडे मदतीची मागणी करत आहेत पण अद्याप काही मद त मिळालेली नाहीये.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles