
ॲड.डॉ.सोपान विठ्ठल बुडबाडकर यांना “लोकरत्न पुरस्कार” प्रदान.
- प्रतिनिधी : मुंबई : प्रमोद तरळ :-देशभक्त पद्मश्री डॉक्ट र रत्नाप्पाण्णा कुंभार यांची ११६ वी जयंती दि. १५ सप्टें बर २०२५ रोजी मुंबई येथे ‘दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र’ या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
- याप्रसंगी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असले ल्या आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या १५ समाज बांधवांचा “लोक रत्न पुरस्कार” देऊन गौरव करण्यात आला.
- ॲड.डॉ.सोपानराव विठ्ठल बुडबाडकर यांना सामाजिक,सा हित्यिक, आध्यात्मिकक्षेत्रासह ज्योतिष शास्त्रातदेखील अ तिशय उत्तम नावलौकिक प्राप्त केले.

- त्यांनी लिहिलेल्या कालसर्प योग – एक शुभ योग’ पुस्तका चे प्रकाशन माॅरिशस येथे पहिल्या जागतिक मराठी ज्यो तिष संमेलनात झाले.
- ज्योतिष शास्त्रातील वेगवेगळ्या विषयांवरील त्यांचे अने क लेख प्रसिद्ध आहेत. अनेक मासिकात लोकप्रिय राशिभविष्य ते लिहित असतात.
- ज्योतिष शास्त्रातील अनेक पदव्यांनी त्यांना वेळोवेळी गौ रविण्यात आले आहे.
- ज्योतिष क्षेत्रातील या भरीव कार्या ची नोंद घेऊन ॲड.डॉ. सोपान बुडबाडकर यांना अनेक मान्यवर मंडळींच्या उप स्थितीत मा.आमदार महेश सावंत यांच्या शुभहस्ते माना चा “लोकरत्न पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात आले.
- पुरस्काराचे स्वरूप सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, पदक,शाल आणि पुष्पगुच्छ असे होते.
- व्यासपीठावर प्रमुख पाहुणे सर्वश्री आर.बी.के. प्रजापति ( राष्ट्रीय संयोजक- अखिल भारतीय प्रजापती महासंघ) मा. सतीश दादा दरेकर(पुणे),मा.रमाकांत क्षीरसागर(नाशिक) ,मा.सुनील आचोळकर (नगरसेवक ,वसई विरार महानगर पालिका ), मा.सतीश कुंकळेकर , गोवा (अध्यक्ष, अखिल भारतीय प्रजापती महासंघ ),डॉ.प्रकाश कुंभार(मा.प्राचार्य , कोल्हापूर), मा.पांडुरंग तात्या कुंभार (उपाध्यक्ष ,कुंभार समाज, महाराष्ट्र प्रदेश ) मा.रंगनाथ सूर्यवंशी, नाशिक (प्रदे शाध्यक्ष अखिल भारतीय प्रजापती संघ ), सौ.शुभांगी ताई खैरकर ( सदस्य माती कला बोर्ड ), मा.नागनाथ कुंभार (राष्ट्रीय उपाध्यक्ष, भारतीय प्रजापती महासंघ ), मा.राजेंद्र कुंभार,(मा.प्राचार्य कोल्हापूर),मा.प्रकाश साळवी (अध्यक्ष कोकण विभाग),इंजिनिअर बबनराव जगदाळे (उपाध्यक्ष, कुंभार समाज महाराष्ट्र प्रदेश ), मा.मोहन कुंभार (उपाध्य क्ष, कुंभार समाज महाराष्ट्र प्रदेश ), मा.महेश शिंदे ( प्रदेश सचिव, राष्ट्रवादी काँग्रेस ), डॉ.पी.बी.कुंभार , सूत्रसंचालक शरद कुंभार , मा.महेश सायकर(अध्यक्ष, नियोजन समिती ), मा.रमाकांत गोरे (सेक्रेटरी, नियोजन समिती), मा.विष्णू मळेवाडकर (अध्यक्ष , कुंभार समाज मुंबई),मा.प्रभू गोरे (खजिनदार,नियोजन समिती), मा.चनबस वायकर (बीड), मा.रामदासकुंभार (बीड),रामदास सांगवेकर (मुंबई ), अनं त महाडकर(रायगड), मा.संजय राजे ( संपादक – कुंभश्री, पुणे), मा. जितेंद्र पाभरेकर इत्यादी अनेक मान्यवर बहुसं ख्येने उपस्थित होते.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











