राजापूर प्रतिष्ठानच्या वतीने दि. २६ सप्टेंबर रोजी भव्य पारंपरिक टिपरी नृत्य स्पर्धा.

  • प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :-राजापूर प्रतिष्ठानचे संस्थापक कै. प्रकाश रामचंद्र कातकर यांच्या स्मरणार्थ शुक्रवार दि. २६ सप्टेंबर २०२५ रोजी श्री महालक्ष्मी मंदिर उन्हाळे राजापूर येथे सायं ६ ते ११ या वेळेत भव्य पारंप रिक टिपरी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
  • सदर स्पर्धेचे उद्घाटन सद्गुरू ह.भ.प. विश्वनाथ (भाई) गो सावी यांच्या हस्ते होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून राजा पूरच्या नायब तहसीलदार सौ. दिपाली पंडित व प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्री मोहन पाडावे उपस्थित राहणार आहेत.
  • या स्पर्धेत नवलादेवी महिला टिपरी नृत्य शीळ, श्री हनुमा न प्रसन्न टिपरी नृत्य खांबलवाडी,धोपेश्वर, आदिष्टी महिला टिपरी नृत्य खालची वाडी,शिवणे बुद्रुक, श्री.महालक्ष्मी म हिला टिपरी नृत्य सोडयेवाडी उन्हाळे, श्री गणपती ठाणेश्व र फुगडी मंडळ टिपरी नृत्य गोठिवरे सागवे,श्री.गणेश कृपा महिला मंडळ टिपरी नृत्य अणसुरे बाकाळे, श्री महालक्ष्मी टिपरी नृत्य पथक कणेरेवाडी, उन्हाळे, नवलादेवी मंडळ टिपरी नृत्य गोंडाळवाडी शीळ आदी संघ सहभागी होणार आहेत.
  • यावेळी आमंत्रित मान्यवरांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
  • स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेत्या संघाला रोख ५,०००/- द्वितीय रोख ३,०००/- आणि तृतीय विजयी संघाला रोख २,०००/- देऊन गौरविण्यात येणार आहे.
  •   या कार्यक्रमाला रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थि त राहून कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन राजा पूर प्रतिष्ठानने केले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles