अतिवृष्टीच्या संकटाच्या काळात सहभागी झालेल्या सर्व घटकांचे तहसीलदार यांनी मानले आभार.

  • प्रतिनिधी : फारूख शेख :- दि. 21 सप्टेंबर, 2025 च्या मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे व महापुरामु ळे परंडा तालुक्यामध्ये अभुतपूर्व घटना घडून तालुक्याती ल लाखी, वडणेर, देवगाव (खु.), ढगपिंपरी, रुई, नालगाव, करंजा, कपिलापुरी व माढा तालुक्यातील मुंगशी या गावां मध्ये अचानकपणे पाण्याच्या प्रवाहामध्ये वाढ होऊन पुरा मध्ये अडकलेल्या 328 नागरिकांना गेल्या 03 दिवसां पासून बचाव पथकाच्या सहाय्याने वाचविण्यात आले आहे.
  • त्याकामी मदत करणाऱ्या केंद्रीय आपत्ती प्रतिसाद पथक (NDRF), राज्य आपत्ती प्रतिसाद पथक (SDRF), Indi an Army, सर्व संबंधीत महसूल सेवक ते मा. जिल्हाधि कारी महोदय यांच्या पर्यंतची सर्व महसूल यंत्रणा, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. /पं. स. विभाग, पोलीस अधि क्षक, पोलीस विभाग, पाटबंधारे विभाग, सिना कोळेगाव प्रकल्प, तालुका कृषी अधिकारी, ग्राम पंचायत अधिकारी / सरपंच, ग्राम महसूल अधिकारी, पशूसंवर्धन विभाग, पोलीस पाटील, महसूल सेवक, आरोग्य विभाग कर्मचारी, संबंधीत गावातील तरूण, नागरिक, ग्रामस्थ, नगर परिषद प्रशासन, राजकीय नेते / कार्यकर्ते, सेवाभावी संस्था/संघ टना, पत्रकार व इतर यांनी आप-आपले सहकार्य व योग दान देवून आपदा काळामध्ये लोकांना वाचविण्यासाठी मदत केली.त्याबददल आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार.
  • तसेच यापुढे भविष्यात अशा आपदा व घटना घडणार ना ही, यासाठी आतापासून जागरूकता ठेवावी, तसेच शास नाच्या विविध विभागांकडून देण्यात येणाऱ्या सूचनांना गांभिर्यपूर्वक घेवून त्याचे अनुपालन करावे.
  • तसेच आपत्तीच्या काळात बचाव कार्यामध्ये लोकांना वा चविण्यासाठी मदत करू इच्छिणाऱ्या इच्छुकांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव यांच्याशी संपर्क करावा. व त्यांच्या मार्फत राब विण्यात येणाऱ्या कार्यक्रमांना उत्सफुर्त प्रतिसाद द्येवून बचाव कार्य प्रशिक्षण घ्यावे व गावां-गावांमध्ये सम-संवाद ठेवण्यात यावा.
  • तसेच सद्यः स्थितीमध्ये आपल्या जिल्हयात आई तुळजा भवानी मंदीर संस्थानामध्ये नवरात्रोत्सव सुरू आहे.
  • त्यामध्येही नागरिकांनी खबरदारी घेवून जिवाची काळजी घ्यावी, अशी विनंती जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles