
पूरग्रस्तांना आधार देण्यासाठी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान सरसावले, मुख्यमंत्री सहायता निधीला एक कोटी रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आले.
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- सध्या राज्यभरात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.
- मराठवाड्यात पावसाने अक्षरशः पैमान घातले असून अने क गावांमध्ये पूराचे पाणी शिरल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुक सान झाले आहे तसेच अनेक कुटुंबे बेघर झाली आहेत.
- या पाश्र्वभूमीवर श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वती ने धाराशिव जिल्हयातील परांडा तालुक्यामधील पुरयस्त भागातील महिलांसाठी एक हजार साड्यांचे वाटप करण्यात आले आहे.

- याशिवाय अजूनही मंदिर संस्थानच्या वतीने विविध प्रका रचे मदतकार्य सुरु आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाशी सम न्वय साधून पूरग्रस्त भागातील नागरिकांना आवश्यक ती मदत वेळोवेळी पुरविण्यात येत आहे.
- जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष किर्ती किरण पुजार स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
- श्री.तुळजाभवानी मंदिर संस्थान है भाविकांनी दिलेल्या देणगीवर चालते. आतिक आणि मंदिर संस्थान यांचे अतूट नाते आहे.
- हाच धागा जपत संस्थान नेहमीच सामाजिक बांधिलकी पार पाडत आले आहे. राज्यात कुठेही नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास मंदिर संस्थान आपत्तीग्रस्तांच्या मदतीला धावून येते.
- याआधीही कोल्हापूर परिसरातील महापुराच्या काळात मंदिर संस्थानच्या वतीने पूरग्रस्तांना अन्नधान्याचे किट पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या तसेच महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले होते.
- पुण्यातील महापुरावेळीही मंदिर संस्थानने मदतकार्य केले होते.
- तसेच २०१९ मध्ये पूरग्रस्तांसाठी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानने मुख्यमंत्री सहायता निधीला २५ लाख रुपयांची दिली होती.
- धाराशिव जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी मुळे श्री तुळजाभ वानी मंदिर संस्थानने मुख्यमंत्री सहायता निधीला एक कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.
- तसेच, अतिवृष्टी मुळे धाराशिव जिल्हयात शेतकन्यांच्या जमिनी खरडून गेलेल्या आहेत. घरांची पडझड झालेली आहे. पिकांचे नुकसान झालेले आहे.जनावरे वाहून गेलेली आहेत.
- अशा गरजू शेतकऱ्यांना मदतीसाठी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान हे धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संपर्कात राहून मदतकार्य करण्याचे नियोजन करत आहे.
- भाविकांप्रती आणि समाजापती असलेली ही बांधिलकी कायम ठेवत आजही तुळजापूरचे श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान पूरग्रस्त कुटुंबांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे.
- देवीच्या भक्तांशी असलेले भावनिक नाते जपत मंदिर सं स्थान नेहमीच संकटाच्या काळात समाजासाठी तत्पर राहिले आहे.

- आजही तेच धागे पुन्हा घट्ट विणले जात आहेत. पूरग्रस्तां च्या दुःखात सहभागी होत श्री तुळजाभवानी मंदिर संस्था न त्यांना आधार देत आहे.
- समाजापती असलेली ही निरंतर बांधिलकी आणि देवी च्या भक्तांशी असलेले भावनिक नाते मंदिर संस्थान नेहमी च जपत आले आहे आणि पुढेही जपत राहील.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











