नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , राज्यस्तरीय कॅडेट तायक्वाॅंडो स्पर्धेत रोटरी स्कूलच्या आयुष जाधव याला सुवर्ण पदक.  – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

राज्यस्तरीय कॅडेट तायक्वाॅंडो स्पर्धेत रोटरी स्कूलच्या आयुष जाधव याला सुवर्ण पदक. 

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतीनीधी : खेड :  प्रमोद तरळ :- दि. १७ जुलै ते २० जुलै २०२४ रोजी दरम्यान चंद्रपूर येथे पार पडलेल्या राज्सस्तरीय तायक्वाॅंडो स्पर्धेत रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूलच्या कुमार आयुष जाधव याने रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत सुवर्ण पदक पटकावले.
  • सदर स्पर्धा ७ वी महाराष्ट्र राज्य कॅडेट क्यारोगी व पुमसे चॅम्पियनशीप २०२४-२५ तायक्वाॅंडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र व तायक्वाॅंडो असोसिएशन चंद्रपूर यांच्यामार्फत चंद्रपूर येथे पार पडल्या.
  • या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्हयातील स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये आयुष जाधव याने रत्नागिरी जिल्हयाचे प्रतिनिधित्व केले.
  • त्याने जिल्हा संघातून ५५ किलो वजनी गटामध्ये बीड, वर्धा, लातूर, कोल्हापूर या जिल्हयातील खेळाडूंवर मात करत सुवर्ण पदक पटकावले.
  • आयुष जाधव हा रोटरी स्कूलमध्ये इयत्ता आठवीमध्ये शिकत असून त्याला तायक्वाॅंडोची लहानपणापासून विशेष आवड आहे. त्याने यापूर्वीही तालुका, जिल्हा व राज्यस्तरावरील अनेक स्पर्धांमध्ये यश मिळवले आहे.
  • सदर स्पर्धेमध्ये अव्वल ठरल्याने त्याला सुवर्ण पदक व प्रश स्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. या यशस्वी खेळाडूला शाळे चे तायक्वाॅंडो प्रशिक्षक कृणाल चव्हाण यांचे मोलाचे मार्गदर्श न लाभले.
  • शाळेचे चेअरमन मा. श्री बिपीनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सुवर्ण पदक विजेता आयुष जाधव याचे अभि नंदन केले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा