
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात केंद्रीय युवा महोत्सवाला सुरुवात.
- प्रतिनिधी : छ.संभाजीनगर : संदीप कारके :- छत्रपती संभाजीनगरः डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्या पीठाचा केंद्रीय युवा महोत्सव आजपासून मोठ्या उत्साहा त सुरू झाला.
- महोत्सवाची सुरुवात विद्यापीठाच्या वाय पॉईंट येथून नि घालेल्या भव्य शोभायात्रेने झाली.

- महोत्सवाचे उद्घाटन ‘हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री वनिता खरात आणि दिग्दर्शक रावबा गजमल यांच्या हस्ते झाले. या उद्घाटन सोहळ्यास विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी अध्यक्षस्थानी होते.
- विद्यार्थ्यांनी पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडवित “विविधते त एकता” हा संदेश दिला.
- विशेष म्हणजे, यंदाच्या शोभायात्रेत महाराष्ट्रासह मराठवा ड्यातील पूरस्थिती व शेतकऱ्यांची बिकट अवस्था याचे विदारक चित्रण विद्यार्थ्यांनी मांडले.
- मराठवाडा विद्यापीठ या शोभायात्रेतील विद्यार्थ्यांच्या कलाकृती आणि सामाजिक जाणिवेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/









