
पंचनामा सुरू असताना शेतकऱ्याची अधिकाऱ्यांसमक्ष विहिरीत आत्महत्याः छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील खादगाव येथील घटना.
- प्रतिनिधी : छ.संभाजीनगर : संदीप कारके :-खादगाव येथील ४५ वर्षीय शेतकरी संजय शेषराव कोहकडे यांनी मंगळवारी दुपारी अडीच वाजता महसूल अधिकाऱ्यांसम क्ष विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.
- कोहकडे यांनी शेतात पाणी साचत असल्यावरून त्यांनी तक्रार केली होती.
- त्या तक्रारीवर पंचनामा करण्यासाठी बालानगरचे मंडळ अधिकारी शुभांगी शिंदे आणि तलाठी लक्ष्मीकांत गोजरे हे घटनास्थळी आले असताना त्यांच्या समोरच कोहकडे यांनी विहिरीत उडी घेतली.

- कोहकडे यांची शेती खादगाव-खेर्डा रस्त्यालगत आहे. दो न्ही बाजूंनी नालीचे खोदकाम झाल्याने त्यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नव्हता.
- तसेच शेतात पाणी साचू लागले. त्यांनी याबाबत अनेकदा महसूल अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती.
- मंगळवारी अधिकारी पंचनामा करत असताना कोहकडे यांनी आपली व्यथा सांगितली. मात्र, अधिकाऱ्यांनी त्यां नाच झापल्याने ते संतापले.
- त्यांनी थेट विहिरीकडे धाव घेत अधिकाऱ्यांसमोरच उडी घेतली. काहींनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचा मृत्यू झाला होता.
- नातेवाईक आक्रमक
- या घटनेनंतर कोहकडे यांचे नातेवाईक आक्रमक झाले. मंडळ अधिकारी, तलाठी आणि संबंधित शेतकऱ्यावर गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली.
- पाचोड ग्रामीण रुग्णालयात त्यांनी उत्तरीय तपासणीस नकार दिला. सपोनि सचिन पंडित, राम बारहाते यांनी रुग्णालयात धाव घेतली.
- नातेवाइकांशी चर्चा करून कायदेशीर कारवाईचे आश्वास न दिल्यानंतर नातेवाइकांनी उत्तरीय तपासणीस परवानगी दिली.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











