चांदवड नगरपरिषदेच्या हद्दीत गुरुकुल कॉलनीत तळवाडे रस्त्याला लागून असलेला लेंडी नाल्यावरून येजा करण्यासाठी पक्क्या बांधकाम पुलाची मागणी.

  • प्रतिनिधी : राजाराम खांगळ ऊर्फ आर के मामा :- चां दवड – तळवाडे या रस्त्याला लागून असलेला गुरुकुल कॉ लनी, महालक्ष्मी नगर व गुजराती कॉलनी अशा सर्व कॉल नीमध्ये लोकांना ये-जा करण्यासाठी तळवाडे रस्त्यानजि क असणारा निकृष्ट व हलक्या दर्जाचा माती पासून बनव लेला साधा पूल असून सदरचा पूल तो दरवर्षी पावसाळ्या त पाण्यामुळे खचून जातो.
  • सदर पुलावरून दिवसभरात हजारो लहान-मोठे वाहने ये जा करतात.
  • तसेच लहान मुलांच्या शाळेच्या गाड्या देखील जात येत असतात तरी देखील नगरपरिषद प्रशासनामार्फत सदर च्या पुलाची दखल घेतली जात नसून सदर पूल दुर्लक्षित आहे.
  • सदरच्या पुलाबाबत परिसरातील नागरिकांची पक्क्या न वीन पुलाची मागणी अनेक वर्षांपासून असून देखील त्या वर कार्यवाही होत नाही.
  • दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे सदरचा पूल खचून गेला असून त्यावर पुन्हा नगर परिषदेमार्फत चालढकल करून दिशाभूल पद्धतीने काम केले जात आहे.
  • परंतु अशा पद्धतीच्या निकृष्ट दर्जाच्या पद्धतीच्या कामामु ळे या कॉलनी परिसरातील रहिवाशी लोकांच्या, शाळकरी लहान मुलांच्या जीवितास कोणत्याही प्रकारची मनुष्यहा नी अथवा जीवित हानी व नुकसान पोहचण्याची भीती निर्माण झालेली आहे.
  • भविष्यात अशी काही दुर्दैवी घटना घडल्यास नगर परिषद प्रशासन जबाबदार राहील. तरी सदर पुलाबाबत लवकरा त लवकर कार्यवाही करण्यात येऊन नवीन पक्का पुलाचे बांधकाम सुरू करण्यात यावे.
  • यासाठी कॉलनी परिसरातील रहिवाशी लोकांच्या वतीने ॲड.संग्राम सोपान थोरात यांनी सुचित केले असून नगर परिषद प्रशासनाने त्वरीत दखल घ्यावी.अशी परिसरातील रहिवाशी लोकांची मागणी आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles