नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , राजापूर रोड व सौंदळ रेल्वे स्टेशन येथे जादा रेल्वे थांबण्यासाठी वसई सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटना मुंबईच्या वतीने कोकण रेल्वेकडे केली मागणी – श्री.यशवंत जडयार – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

राजापूर रोड व सौंदळ रेल्वे स्टेशन येथे जादा रेल्वे थांबण्यासाठी वसई सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटना मुंबईच्या वतीने कोकण रेल्वेकडे केली मागणी – श्री.यशवंत जडयार

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतीनीधी : राजापूर : प्रमोद तरळ :- कोकण रेल्वेच्या प्रक ल्पात ज्या महाराष्ट्र राज्याने सर्वाधिक म्हणजे २२% गुंतवणू क केली त्याच्या वाट्याला फक्त तीनच रेल्वे आल्या.
  • त्यामुळेच प्रवाशांच्या तुलनेत येथे रेल्वे मिळत नसल्याने चाक रमन्यांची प्रवासा दरम्याने मोठी गैरसोय होतेय,कोकण रेल्वे मार्गावर रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर रोड ( RAJP ) रेल्वे स्टेशन हे ऐतिहासिक पा२र्वभूमी लाभलेले स्टेशन असून त्या च्या एका बाजूला अरबी समुद्र तर दुसऱ्या बाजूला सह्याद्री असा तालुक्याचा मोठा विस्तार पसरलेला आहे.
  • तालुक्यातील बहुतेक गावे ही मुंबई ते राजापूर दरम्यानच्या प्र वासासाठी राजापूर रोड या रेल्वे स्थानकावर अवलंबून आहेत.
  • त्यामुळे राजापूर तालुक्यातील हे महत्त्वाचे रेल्वे स्टेशन आहे. या स्टेशनवर आजपर्यंत १०१०५/०६ दिवा सावंतवाडी एक्सप्रे स, १०१०३ / ०४ मांडवी एक्सप्रेस, ११००३ / ०४ तुतारी एक्स प्रेस व २०१११/ १२ कोकणकन्या एक्सप्रेस या नियमित फ क्त आठच एक्सप्रेस या रेल्वे स्थानकात थांबतात.
  • मात्र राजापूर रोड या रेल्वे स्टेशनचे वार्षिक उत्पन्न हे उल्लेख निय आहे. तसेच तालुक्यात प्रसिद्ध राजापूरची गंगा,उन्हाळे गरम पाण्याचे झरे,‌ राजापूरातील इंग्रजांची वखार, आडीवऱ्या चे महाकाली मंदिर, धुत्तपापेश्वर मंदिर ही प्रसिद्ध पर्यटन स्थळे असून जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प अशा अनेक कारणामुळे येथे प्रवाशांची नेहमी मोठी वर्दळ असते.
  • यासाठीच आम्हाला १) १६३४५ / ४६ – नेत्रावती एक्सप्रेस, २) १२०५१ / ५२ – जनशताब्दी एक्सप्रेस, ३) १२१३३ / ३४ मंगळूर एक्सप्रेस, ४) १६३३७ / ३८ -ओखा एर्णाकुलम एक्स प्रेस, ५) १९२६० / ५९ – भावनगर कोचिवल्ली एक्सप्रेस, ६) १६३३५ / ३६ – गांधीधाम नागरकोईल एक्सप्रेस, ७) ११०९९ / ०० – लोकमान्य टिळक मडगाव एक्सप्रेस, ८) २२९०८/ ०९ हाप्पा एक्सप्रेस ह्या एक्सप्रेसना राजापूर रोड रेल्वे स्टेशन ये थे अतिरिक्त थांबे मिळावेत,अशी स्थानिकांची मागील अनेक वर्षाची मागणी आहे.
  • तसेच राजापूर रोड स्टेशन येथे पूर्ण वेळ PRS सुविधा मिळा वी तसेच नियमीत रेल्वे गाड्यांचा आरक्षण कोटाही वाढवून मिळावा.
  • तसेच राजापूर तालुक्यातील दुसरे महत्वाचे सौंदळ स्टेशन ( SUAL ) ह्या रेल्वेस्टेशनवर ११००३ / ०४ तुतारी एक्सप्रेस ला अतिरिक्त थांबा मिळावा, तालुक्यातील पूर्व विभागातील सर्व गावांना सौंदळ हे स्टेशन नजीक असल्याने स्टेशनवर सु लभ सौचालय,सुसज्ज तिकीट खिडकी,प्लाटफॉर्म,स्टेशन र स्ता,लाईट ह्या मूलभूत गरजांची तरी पुर्तता करावी,अशी स्था निक भूमिपुत्रांच्या वतीने कोकण रेल्वे प्रशासनाकडे मागणी केली जात आहे.
  • राजापूर रोड व सौंदळ रेल्वे स्टेशन येथे अतिरीक्त रेल्वे गा डयांना थांबे मिळाल्यास राजापूर तालुक्यातील दळणवळणा मध्ये भर पडून स्थानिक रोजगार व व्यवसायाला चालना मि ळेल यासाठी येथील लोकप्रतिनिधींनी याकडे गांभीर्याने पाहा वे असे श्री. यशवंत जडयार यांनी सांगितले.
  • कोकण रेल्वेवर काम करण्याऱ्या वसई सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने या मागणीच्या प्रति मा.श्री.ना रायण राणे साहेब खासदार : रत्नागिरी सिधुदुर्ग,मा.श्री.उदय सामंत साहेब : पालकमंत्री रत्नागिरी, मा.श्री.राजन साळवी साहेब : आमदार राजापूर,मा.श्री.स्टेशन मास्तर : राजापूर रोड यांना देण्यात आल्याचे सेक्रेटरी श्री.यशवंत जडयार यांनी सांगितले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा