नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , देशातील 11 राज्यांमध्ये आज वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस; महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

देशातील 11 राज्यांमध्ये आज वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस; महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतीनीधी : कल्पेश राणे :- देशासह राज्यातील हवामानात अनेक मोठे बदल झाले असून आज शनिवारपासून पुढील 4 दिवस मुसळधार पाऊस पडणार, असा अंदाज भारतीय हवा मान खात्याने वर्तवला आहे.
  • सध्या उत्तर-पश्चिम बंगालचा उपसागर आणि लगतच्या परिस रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्याच्या प्रभावामुळे पुढील आठवडाभर पूर्व आणि मध्य भारतात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
  • महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू, कर्नाटकात पुढील 2 ते 3 दिव सांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे.
  • त्याचवेळी, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये 20 ऑगस्ट पर्यंत हलकात ते मध्यम पाऊस होऊ शकतो. दुसरीकडे जम्मू-काश्मीर, लडाख, उत्तर प्रदेश आणि पूर्व राजस्थानमध्ये ही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय.
  • उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस
  • उत्तराखंडमध्ये सध्या जोरदार पाऊस सुरू असून श्रीनगर जि ल्ह्यात दोन ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटना घडल्या.
  • परिणामी ऋषिकेश-बद्रीनाथ महामार्ग शुक्रवारी दीड तासांहून अधिक काळ ठप्प होता. महामार्ग बंद झाल्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
  • केदारनाथमध्ये पावसाचा कहर
  • केदारनाथमध्ये पावसाने अक्षरश: कहर केला असून अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश्य पाऊस झालाय. या पावसामुळे आतापर्यंत अनेकांचा मृत्यू झाला आहे.
  • शुक्रवारी लिंचोली दरड कोसळून तिघांचा मृत्यू झालाय. गौरी कुंड-केदारनाथ पदपथावर सुरू असलेल्या शोध मोहिमे दरम्यान, लिंचोलीतील ढिगाऱ्यांमधून तीन मृतदेह सापडले आहेत.
  • राजस्थानमध्ये तुफान पाऊस
  • राजस्थानमधील जयपूर जिल्ह्यातील शुक्रवारी मुसळधार पा ऊस झाला. मासी नदीला अचानक आलेल्या पुरामुळे शाळेला जोडणारा पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला.
  • त्यामुळे 42 विद्यार्थी आणि आठ शिक्षक आणि कर्मचारी तब्बल 27 तास शाळेतच अडकून पडले होते. यानंतर गाव कऱ्यांनी शाळेतच मुलांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था केली.
  • महाराष्ट्रात कुठे-कुठे कोसळणार पाऊस?
  • भारतीय हवामान खात्याने आज शनिवारपासून महाराष्ट्रात पावसाचा इशारा दिला आहे. विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, अकोला, वर्धा, वाशीम, यवतमाळसह अनेक जि ल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट दिला.
  • मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धारा शिव, परभणी, लातूर, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातही का ही ठिकाणी शनिवारपासून जोरदार पावसाची शक्यता आहे.
  • मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोला पूर, नगर आणि जळगाव जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा