
वाटूळ येथील चौकडी व होळीचा मांड येथे नागरीकांच्या सहाय्याने सौर दिव्यांची उभारणी.
- प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :- लोकसहभागातून गावाचा विकास याचे एक उत्तम उदाहरण वाटूळ गावाती ल ग्रामस्थांनी घालून दिले आहे.

- वाटूळ चौकडी येथील नागरिक श्री.वीरेंद्र चव्हाण, श्री.निले श चव्हाण, श्री.संजित चव्हाण, श्री.प्रकाश चव्हाण, सौ. उ ज्ज्वला सावंत आणि अमोल चव्हाण यांच्या आर्थिक सह कार्याने चौकडी वाडी नजिकच्या वहिवाटीच्या रस्त्यावर व गावातील शिवप्रतिष्ठानच्या वतीने होळीचा मांड येथे सौर उर्जेचे दिवे बसविण्यात आले आहेत.

- यामुळे स्थानिक नागरिकांना रात्रीच्या वेळेस सुरक्षित व सोयिस्कर प्रवास शक्य झाले असून गावातील सामाजिक जीवनमान उंचावले आहे.
- विशेषतः विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिकांना याचा फाय दा होणार आहे.

- या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी अरुण चव्हाण, सुधाकर च व्हाण (बाळू काका) व अजय चव्हाण यांचे विशेष सहका र्य लाभले आहे.
- त्यांच्या मार्गदर्शनामुळे व समन्वयातून हा उपक्रम साकार झाला.गावकऱ्यांनी या सर्व सहकार्याबद्दल संबंधित व्यक्तीं चे तसेच सर्व चौकडीकर यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











