धनंजय सावंत यांच्या गावभेट दौऱ्यास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ; गावागावात विविध कामांचे सावंत यांच्या हस्ते पुजन.
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- दि.२८रोजी जिल्हा परि षद माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी परंडा तालुक्यातील इनगोंदा ,चिंचपुर(खु) जेकटेवाडी,चिंचपुर( बु) पांढरेवाढी येथे गावभेट घेऊन ग्रामस्थांच्या अनेक अडचणी जाणुन घेतल्या.
- नागरीकांनी आपल्या आडचणी सावंत यांच्या काणावर घात ल्या. शक्य तेवढ्या अडचणीचे निवारण करण्याचा शब्द धनंजय सावंत यांनी गावातील ग्रामस्थांना दिला.
- लाकडी बहीण,लाडका भावाचे कोणी अर्ज भरले नसतील तर ते भरून घेण्याचे आवाहन ग्रामस्थांना सावंत यांनी केले. त्याच बरोबर गावातील मंदीराचे सभामंडप व रस्त्याचे कामे मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
- तर खंडेश्वर प्रकल्पाचे काम टेंडर मुळे आडकले होते ते लवकरच सुरू होणार असल्याचे सावंत यांनी ग्रामस्थाना सांगितले.
- यावेळी बोलताना सावंत म्हणाले की, तुम्ही आम्हाला गेले पाच वर्षांसाठी सालगडी म्हणून तुमची सेवा करण्यासाठी निवडुण दिले आहे.
- आम्ही केलेली सेवा योग्य वाटली असेल तर पुढची पाच वर्षे सेवा करण्याची संधी देण्याची विनंती सावंत यांनी चिंचपुर (बु) येथील ग्रामस्थाना केली.
- या दौऱ्यावेळी चिंचपुर (खु)ते वाटेफळ ह्या जुन्या रस्त्याच्या कामाचे तर जेकटेवाडी ते धनेगांव दोन किमी शीव रस्ता व गावठाण ते केसकर वस्ती रस्ता काम, शेळगाव येथील स्मशा नभूमी रस्ता कामाचे पुजन,इंनगोदा येथील जगताप वस्ती व औसरे वस्ती या रस्त्याचे उद्घघाटन व श्रीफळ फोडून पुजन ,चिंचपुर (बु) येथील आठवडी बाजार तळाचे भुमीपुजन धनंज य सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.
- इंनगोदा ,चिंचपुर(खु),जेकटेवाडी,चिंचपुर (बु),पांढरेवाढी , शेळगाव येथील सावंत यांनी विविध कामांची पुजने करून कामे मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्यामुळे व काही कामे पूर्ण झाली असल्यामुळे ग्रामस्थातुन समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
- सदरील प्रत्येक गावात धनंजय सावंत यांचा शाल,श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space