पाचल गावात दारु दुकानाला परवानगी न देण्याचा ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर.
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
- प्रतीनीधी : राजापूर : प्रमोद तरळ :- तालुक्यात विस्ताराने व लोकसंख्येने सर्वात मोठ्या असलेल्या पाचल ग्रामपंचायती ने गावात दारु दुकानाला परवानगी न देण्याचा एकमुखी ठरा व ग्रामसभेत संमत केला याबाबतचा प्रस्ताव ग्रामसभेत चर्चे ला ठेवण्यात आला होता.
- सरपंच बाबालाल फरास यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रा मसभेत हा विरोधाचा ठराव संमत करण्यात आला.
- या ठरावानंतर ग्रामस्थ व महिलांनी या निर्णयाचे टाळ्यांच्या गजरात स्वागत केले पाचल गावातील एका व्यक्तीने गावात देशी दारूचे दुकान सुरु करण्यासाठी ग्रामपंचायतीकडे अर्ज केला होता.
- या अर्जावर ग्रामसभेत चर्चा करण्यात आली या चर्चे दरम्यान एका ग्रामस्थांने या ठरावाला समर्थन देण्याचा प्रयत्न केला. त्याला सर्व ग्रामस्थ व महिलांनी कडाडून विरोध केला.
- त्यानंतर सरपंच फरास यांनी याला ज्याचे समर्थन असेल त्यां नी हात वर करावे अशी सूचना केली त्यानंतर सभागृहातील एकानेही हात वर केला नाही.
- त्यानंतर देशी दारूचे दुकान सुरु करण्यासाठी आलेला अर्ज एक मुखाने फेटाळण्यात आला यापुढे गावात देशी दारू दुका नाला परवानगी न देण्याचा ठराव संमत करण्यात आला.
- ग्रामसभेत बदलापूरमध्ये झालेल्या लहान मुलीवरील अत्या चाराचा जाहीर निषेध करण्यात आला अशा प्रकारच्या घटना आपल्या गावात घडू नयेत म्हणून सतर्क राहण्याचे आवाहन माजी सरपंच अशोक सक्रे यांनी केले.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space