नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , शिवडी येथील किर्ती रात्र विद्यालयात ‘तिमिरातुनी तेजाकडे’ यांच्या वतीने २९६ वे निःशुल्क स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर संपन्न.  – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

शिवडी येथील किर्ती रात्र विद्यालयात ‘तिमिरातुनी तेजाकडे’ यांच्या वतीने २९६ वे निःशुल्क स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर संपन्न. 

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतीनीधी : मुंबई : प्रमोद तरळ :- किर्ती रात्र विद्यालय शिव डी प्रशालेत तिमिरातुनी तेजाकडे यांच्या वतीने बुधवार दि.२८ ऑगस्ट २०२४ रोजी संध्यकाळी ७.०० वाजता स्पर्धा परीक्षां चे मार्गदर्शन करण्यात आले.
  • शासकीय नोकरी व स्पर्धा परीक्षांचा विचार केला तर गरीब विद्यार्थी मागे पडतात याचे प्रमुख कारण म्हणजे विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाचा अभाव.
  • सदर बाबीचा विचार करुन सन्मा श्री चंद्रकांतराव शिंदे अध्य क्ष प्रगती मंडळ मुंबई यांनी निःशुल्क स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले होते.
  • प्रमुख मार्गदर्शक श्री सत्यवान यशवंत रेडकर सर (बीकॉम, एमकॉम, एमए(हिंदी), एमए (पब्लिक ऍडमिन), एलएलबी, पीजीडीएचआरएम, पीजीडीएलएल & आयएल, पीजीडीटी) कनिष्ठ अनुवाद अधिकारी सीमा शुल्क विभाग मुंबई, भारत सरकार ह्यांचे हे २९६ वे निःशुल्क मार्गदर्शन शिबिर होते.
  • विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास कसा क रावा,स्पर्धा परीक्षांमध्ये यूपीएससी अंतर्गत कोणत्या शासकी य विभागात नोकरी मिळवता येते, केंद्र व राज्य शासनाच्या नोकऱ्यांमध्ये असणाऱ्या सेवा, सुविधा याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
  • आजची वास्तविक शिक्षण पद्धती शिकता शिकता स्पर्धा परी क्षा व आपले ध्येय समोर ठेवून अभ्यास करणे गरजेचे आहे. एम.पी.एस.सी अंतर्गत कोणत्या शासकीय नोकऱ्या उपलब्ध असतात, याविषयीही मार्गदर्शन केले.
  • त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या अंतर्गत सरळ सेवा भरती को णत्या पदासाठी असते, तसेच केंद्र व राज्य सरकारच्या भर ती प्रक्रियेसाठी शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा काय असते या बाबत ही माहिती दिली.
  • सदर मार्गदर्शन शिबिरास प्रगती मंडळाचे अध्यक्ष श्री.चंद्रकांत राव शिंदे, विश्वस्त, मुख्याध्यापक श्री. शिवाजी आव्हाड, शिक्ष क व शिक्षकेतर कर्मचारी तसेच माजी विद्यार्थी उपस्थित होते.
  • सूत्रसंचालन श्री गोरख इंगोले सर यांनी तर आभार प्रदर्शन श्री.सत्यविजय डांबरे सर यांनी केले.
  • किर्ती रात्र विद्यालयातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना बहुमूल्य निःशुल्क मार्गदर्शन केल्या बद्दल प्रगती मंडळ मुंबई यांनी श्री सत्यवान यशवंत रेडकर सर यांचे आभार व्यक्त केले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा