नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , ग्रंथालय चळवळीतील दीपस्तंभ हरपला. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

ग्रंथालय चळवळीतील दीपस्तंभ हरपला.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतीनीधी : रत्नागिरी : प्रमोद तरळ :- दापोली तालुक्याती ल करंजाणी येथील गजानन शंकर कालेकर यांचे हृदयविका राने गुरूवार दिनांक २९ ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता वयाच्या ७३ व्या वर्षी निधन झाले.
  • त्यांच्या अचानक जाण्याने रत्नागिरी जिल्ह्यातील लेखन वाच न आणि ग्रंथालय चळवळीतील दीपस्तंभ हरपल्याची प्रतिक्रि या रत्नागिरी जिल्हाभरातून व्यक्त होत आहे.
  • गजानन कालेकर हे ग्रंथालय चळवळीशी एकरूप झालेले व्य क्तीमत्व होते. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर येथे निवृत्ती पर्यंत ज्येष्ठ लिपिक म्हणून आपला ठसा उमटवला.
  • त्या समवेतच ग्रंथालय चळवळीत त्यानी कामाला सुरूवात केली.निवृत्तीनंतर ग्रंथालय हेच कुटुंब मानून रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व ग्रंथालयांना लागेल ती मदत आणि मार्गदर्शन त्यांनी सुरू केले.
  • गजानन कालेकर हे अनेक संस्थाचे उर्जा स्थान होते. रत्नागि री जिल्हा ग्रंथालय संघाचे कोषाध्यक्ष, कोकण विभाग ग्रंथाल य संघटनेचे सदस्य,राज्य ग्रंथालय संघटनेचे सदस्य म्हणूनही ते कार्यरत होते.
  • कोकण विभाग ग्रंथमित्र पुरस्कार,सर्वोत्कृष्ट ग्रंथालय कार्यक र्ता पुरस्कार असे अनेक पुरस्कारांनी त्यांना प्राप्त होते. दापो ली ,खेड, मंडणगड,चिपळूण येथील सुमारे पंचाहत्तर ग्रंथाल यांच्या जडणघडणीमध्ये त्यांचे मोलाचे योगदान होते.
  • माजी सैनिकांना व त्यांच्या पश्चात वीरपत्नींना निवृत्तीवेतन प्राप्त करून देण्यात ते अग्रेसर होते. त्यांची लेखन शैली ही स्वभावानुसार तरल आणि अभ्यासू होती.
  • अनेक वृत्तपत्र व मासिकांतून त्यांचे लेखन सुरू होते.आपल्या मूळ गावी करंजाणी येथे असलेल्या छत्रपती शिवाजी ज्ञानसं वर्धन मंडळाचे ते सचिव म्हणून काम पहात होते.
  • करंजाणीतील परंपरागत टुमदार घरात एकत्र कुटुंब पद्धती मध्ये ते रहात होते.त्यांच्या पश्चात पत्नी, मुंबई व पुणे स्थित दोन मुलगे ,एक मुलगी नातवंडे असा परिवार आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा