नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , आर.एस.गायकवाड डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय सेवा रत्न पुरस्काराने सन्मानित. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

आर.एस.गायकवाड डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय सेवा रत्न पुरस्काराने सन्मानित.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- धाराशिव दि. 2 सप्टेंबर २०२४ येथील वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सहसचिव त था अनुदुर तालुका तूळजापूर जिल्हा धाराशिव येथील ज्येष्ठ समाजसेवक आर.एस.गायकवाड यांना नुकताच डॉ.बाबा सा हेब आंबेडकर राष्ट्रीय सेवा रत्न पुरस्कार प्राप्त झाला.
  • त्यांनी गेल्या 30-35 वर्षांमध्ये विद्यार्थी चळवळीपासून ते शै क्षणिक सामाजिक व राजकीय क्षेत्रात अनमोल असे कार्य करून जिल्ह्यातच नव्हे तर मराठवाड्यामध्ये आपल्या कारकि र्दीमुळे सर्वांच्या परिचयाचे आहेत.
  • त्यांनी अनेक चळवळीमध्ये, नामांतर लढ्यामध्ये खूप मोठी कामगिरी बजावली आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत सहारा चारिटेबल ट्रस्ट या राष्ट्रीय संस्थेने आर एस गायकवाड यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय सेवा रत्न पुरस्कार प्रदान केला आहे.
  • या पुरस्काराचे वितरण वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण शिंदे फुले आंबेडकर विद्वत सभेचे राज्य समन्वयक डॉ.शहाजी चंदनशिवे वंचित बहुजन आघाडीचे धाराशिव जि ल्हा महासचिव धनंजय सोनटक्के, बाबासाहेब जानराव, जि ल्हा सहसचिव मोहन दादा बनसोडे ,महाराष्ट्र पोलीस टाईम चे संपादक उमेश काळे ,युनुस पटेल , बाबुराव गायकवाड उ मरगा, नामदेव वाघमारे, विद्यानंद वाघमारे, बाबासाहेब वाघमा रे, वंचित बहुजन आघाडीचे परांडा तालुका उपाध्यक्ष मधुकर सुरवसे, परंडा तालुका सहसचिव राहुल पवार या सर्वांच्या उ पस्थितीमध्ये या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
  • यावेळी धाराशिव जिल्ह्यातील अनेक मित्रपरिवार कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
  • यावेळी फुले शाहू आंबेडकर विद्वत सभेचे राज्य समन्वयक डॉ.शहाजी चंदनशिवे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ते आपल्या मनोगतात म्हणाले की आर एस गायकवाड हे एक समाजसेवेने झपाटलेले व्यक्तिमत्व असून त्यांनी बहुजन समाजासाठी विविध क्षेत्रामध्ये फार मोठे योगदान दिले आहे.
  • त्यांच्या नोकरीच्या सेवानिवृत्तीनंतरही त्यांनी स्वतःला झोकून दिले आहे. तेव्हा समाजाला ते एक आदर्श ठरले असून समा जातील प्रत्येक कार्यकर्त्यांनी त्यांचा आदर्श घेऊन समाज हिताचे प्रमाणिक काम करावे.
  • शेवटी जिल्हा महासचिव धनंजय सोनटक्के यांनी सर्वांचे आ भार मानले. आर एस गायकवाड यांना मिळालेल्या डॉ.बाबा साहेब आंबेडकर राष्ट्रीय सेवा रत्न पुरस्कारामुळे त्यांच्या मि त्र परिवारांनी आप्तेष्टांनी अभिनंदन व कौतुक केले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा