नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , आंगले येथील सामाजिक कार्यकर्ते विलास राऊत यांनी दिले विविध समस्यांबाबत कोकण रेल्वे प्रशासनाला निवेदन. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

आंगले येथील सामाजिक कार्यकर्ते विलास राऊत यांनी दिले विविध समस्यांबाबत कोकण रेल्वे प्रशासनाला निवेदन.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतीनीधी : राजापूर : प्रमोद तरळ :- कोकणातील चाकरमा नी हे आपल्या परिवारासह गणेशोत्सव, शिमगा व इतर सणा सुदीच्या कालावधीत तसेच मे महिन्याच्या सुट्टीत कोकणात आपल्या गावी जात असतात.
  • जलद आणि सुखरूप प्रवासाच्या दृष्टीने बहुतांशी चाकरमानी कोकण रेल्वेने प्रवास करतात. ‌
  • बहुतांश चाकरमानी सणासु दीकरिता आपल्या गावी जाण्या साठी चार महिने अगोदर आर क्षित तिकीट मिळविण्या करि ता तासंतास रांगेत उभा राहूनही सामान्य जनतेला मात्र ति कीट प्रतिक्षा यादीतील मिळते आणि अनेक प्रयत्न करूनही शेवटपर्यंत तिकीट प्रति यादीतच राहते.
  • गावी जाण्यासाठी पर्याय म्हणून नाईलाजाने खाजगी वाहनां ना दहा पटीने भाडे देऊन प्रवास करावा लागतो. गणेशोत्सवा करीता चाकरमान्यांना कोकणात आपल्या गावी जाता यावे.
  • यासाठी रेल्वे प्रशासन कोकणाकरिता अनेक गाड्या सोडता त. परंतु त्या गाड्यांचे तिकीट आरक्षण सुरू होताच अवघ्या काही सेकंदात तिकिटांचे आरक्षण फुल होऊन हजाराच्या वर प्रतिक्षा यादी जाते, ही बाब सर्वसामान्य चाकरमान्यांसाठी अत्यंत आश्चर्यजनक वाटते.
  • असा प्रकार गेल्या काही वर्षापासून रेल्वे प्रशासन आणि रेल्वे एजन्ट मिळून काळाबाजार करत असल्याची सर्वसामान्य चा करमान्यांच्या मनात शंका निर्माण होत आहे.
  • त्यामुळे सामान्य चाकरमान्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. तरी राजापूर तालुक्यातील आंगले गावातील सामा जिक कार्यकर्ते विलास राऊत यांनी सर्वसामान्य माणसाच्या मनातील नाराजी रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे.
  • आरक्षित तिकीटांबाबत होणाऱ्या काळाबाजाराची योग्य चौक शी करून त्वरित कठोर कारवाई करण्याचे आदेश द्यावेत.
  • कोकण मार्गे जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या व जलद गाडयांना सणासुदीच्या काळामध्ये मुंबईपासून कोकणापुरते काही डब्बे आरक्षित ठेवण्यात यावेत.
  • तसेच त्या गाडयांना पनवेल, रत्नागिरी ते थेट मडगाव येथे थां बत असल्यामूळे इतर मधल्या स्थानकांतील प्रवाशांना प्रवास करता येत नाही.
  • तरी किमान रत्नागिरी पासून सावंतवाडी पर्यंत सर्व गाडयांचे थांबे वाढवावेत, जेणेकरून सणासुदीच्या काळात चाकरमनी आपल्या गावी जाऊ शकतात अशा चाकरमान्यांच्या भेडसाव णाऱ्या विविध मागण्या त्यांनी निवेदनात नमूद केल्या आहेत.
  • सदर निवेदन देतेवेळी विलास राऊत लांजा तालुक्यातील इंद वटी गावचे ग्रामस्थ दशरथ घडशी तसेच चंद्रकांत के राऊत, शशिकांत कॄ राऊत आदी उपस्थित होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा