नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , रा.गे.शिंदे महाविद्यालयामध्ये कै.रा.गे.शिंदे गुरुजी गुरुजी यांची १०० वी जयंती संपन्न. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

रा.गे.शिंदे महाविद्यालयामध्ये कै.रा.गे.शिंदे गुरुजी गुरुजी यांची १०० वी जयंती संपन्न.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- दि. ७ सप्टेंबर २०२४ येथील श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालय परंडा येथे सं स्थापक अध्यक्ष कै.रा.गे.शिंदे गुरुजी यांची शंभरावी जयंती आज विविध कार्यक्रमांतून संपन्न झाली.
  • श्री.भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव या संस्थेचे अध्य क्ष सुनील नाना शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज ७ सप्टेंबर रोजी कै.रा.गे शिंदे गुरुजी यांची जयंती असल्याने त्यांच्या ह स्ते प्रतिमापूजन करण्यात आले व महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
  • यावेळी व्यासपीठावर संस्था अध्यक्ष सुनील नाना शिंदे उप प्राचार्य डॉ महेशकुमार माने स्टाफ सेक्रेटरी डॉ.शहाजी चंदन शिवे कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक प्रा किरण देशमुख प्राणी शास्त्र विभाग प्रमुख डॉ.अतुल हुंबे उपस्थित होते.
  • कै.रा.गे शिंदे गुरुजी यांच्या १०० व्या जयंती निमित्त प्राणशा स्त्र विभाग प्रमुख डॉ.अतुल हुंबे यांनी महाविद्यालयातील क निष्ठ वरिष्ठ विभागातील प्रत्येक शाखेच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळवल्याने त्यांचा प्रमाणपत्र ट्रॉफी व गोल्ड मेडल देऊन त्या विद्यार्थ्यांना रविण्यात यावी असा मानस केला होता.
  • त्याप्रमाणे मान्यवरांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार कर ण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ शहाजी चंदनशिवे यांनी केले.
  • यावेळी दिनांक 1 सप्टेंबर ते सात सप्टेंबर दरम्यान आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमाचे अहवाल कनिष्ठ विभागाचे पर्यवे क्षक प्रा किरण देशमुख यांनी सादर केला.
  • यावेळी धाराशिव जिल्ह्यामधून वाणिज्य विभागात इयत्ता बा रावी मध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांमधून जिल्ह्यात प्रथम क्रमां क आल्याने कुमारी ठोसर निकिता सुभाष या विद्यार्थिनीस सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय धाराशिव सा माजिक न्याय विशेष सहाय्य विभाग यांच्यातर्फे 5000 रुप याचा धनादेश देण्यात आला होता तो मान्यवरांच्या हस्ते सदर विद्यार्थ्यांनी सुपूर्द करण्यात आला.
  • राजश्री छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार या नावाने सदर विद्यार्थिनीस पाच हजार रुपयांचा धनादेश देऊन सन्मा नित करण्यात आले.
  • यावेळी महाविद्यालयातील इयत्ता बारावी कला विभागातून कु.खरात पूजा सतीश या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक वाणिज्य विभागातून कु.ठोसर निकिता सुभाष यांनी प्रथम क्रमांक तर विज्ञान विभागातून कु.खराडे अक्षदा रामराजा यांनी प्रथम क्र मांक मिळवल्याने त्यांचा मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी व प्रमाणप त्र देऊन सत्कार करण्यात आला.
  • वरिष्ठ विभागातून कला शाखेतून कु.खंडागळे पल्लवी कल्या ण प्रथम विज्ञान शाखेतून कु.मुळे भाग्यश्री ज्योतीराम प्रथम व वाणिज्य विभागातून कु.पाटील अहिल्या दादासाहेब प्रथम क्रमांक घेऊन महाविद्यालयातून उत्तीर्ण झाले आहेत.
  • तसेच एम.एस.सी वनस्पतीशास्त्र विषयात कु.क्षीरसागर रूपा ली या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक एम.ए.स्सी प्राणीशास्त्र विष यात कु.शुभांगी तुळशीराम गायकवाड हिने प्रथम क्रमांक तर कु.पूजा रमेश नलवडे या विद्यार्थिनीने रसायनशास्त्र विषयात प्रथम क्रमांक मिळविला आहे.
  • एम कॉम या वाणिज्य शाखेत कु.करिष्मा मोहम्मद रफीक सा चे या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक मिळविल्याने सर्वांचा प्रमाण पत्र ट्रॉफी व गोल्ड मेडल देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
  • महाविद्यालयातील विविध समितीचे चेअरमन व त्या समितीचे सदस्य यांचा ही यावेळी सत्कार करण्यात आला. प्रा.डॉ.अतु ल हुंबे यांनी प्रथमच १०० व्या जयंती निमित्त स्वेच्छे ने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्याचा मानस केला होता.
  • त्याप्रमाणे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
  • शेवटी कार्यक्रमाचे आभार सांस्कृतीक विभाग प्रमुख डॉ. शहा जी चंदनशिवे यांनी मानले. यावेळी कनिष्ठ वरिष्ठ भागातील प्राध्यापक सहशिक्षक व शिक्षक केंद्र कर्मचारी मोठ्या संख्ये ने उपस्थित होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा