
परतीच्या पावसामुळे साक्री तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान — राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची हेक्टरी ₹५०,००० नुकसान भरपाईची मागणी.
- प्रतिनिधी : हर्षल ठाकरे :- परतीच्या पावसामुळे साक्री तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुक सान झाले आहे.
- या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष तर्फे तहसीलदारांना निवेदन देऊन शेतकऱ्यांना सरसकट हेक्ट री ₹५०,०००/- नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्या त आली आहे.

- निवेदनात म्हटले आहे की, सततच्या पावसामुळे हातात आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला असून शेतकरी वर्ग प्रचंड आर्थिक संकटात सापडला आहे.
- आधीच उन्हाळी आणि पावसाळी कांद्याचे नुकसान झा ल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
- पंचनामे आणि कृषी अहवालांच्या अटी न लावता सर्व शे तकऱ्यांना एकसमान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
- यासोबतच पक्षाने काही महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत :
- १.दिवाळीपूर्वी सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर करावी.
- २.ई-पिक पाहणी नोंदणी ऑफलाइन करण्याची सुविधा द्यावी, कारण अनेक शेतकऱ्यांकडे Android मोबाईल आणि नेटवर्कची सुविधा उपलब्ध नाही.
- ३. दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची शालेय फी व एस.टी. पास फी माफ करण्यात यावी.
- हे निवेदन साक्री तहसीलदार यांना जिल्हाध्यक्ष जितेंद्र म राठे,सयाजी ठाकरे, प्रदेश उपाध्यक्ष किसान सभा, तालुका ध्यक्ष गिरीश नेरकर, जिल्हा कार्याध्यक्ष हर्षल ठाकरे, हेमंत देसले आणि विष्णू देसले, रवी तोरवने, बापू गायकवाड, प्रदीप नांद्रे, राहुल वाघ, सुभाष सूर्यवंशी यांच्या उपस्थिती त देण्यात आले.

- पक्षाने प्रशासनाला विनंती केली आहे की शेतकऱ्यांच्या प्र श्नांकडे सहानुभूतीपूर्वक लक्ष देऊन तात्काळ निर्णय घे ण्यात यावा, जेणेकरून सणासुदीच्या काळात शेतकऱ्यां च्या चेहऱ्यावर दिलासा उमटेल.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











