नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , विजयराव खडसेच का..? – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

विजयराव खडसेच का..?

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतिनिधी : यवतमाळ : इरफान शेखजी शेख :- 2002 ते 2007 च्या दरम्यान, अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत आदर णीय विजयराव खडसे साहेब यांच्या पत्नी सौ.प्रतिभा विजय राव खडसे ह्या जिल्हापरिषद सदस्य झाल्या.
  • त्यानंतर २००५ ते २००७ पर्यँत त्या यवतमाळ जिल्ह्यपरिषदे च्या अध्यक्षही झाल्या. आदरणीय प्रतिभा खडसे यांच्या कार किर्दीत यवतमाळ जिल्ह्यात अनेक विकासाची कामे झालीत. जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून त्यांची कारकीर्द अत्यंत उल्ले खनीय झाली..!
  • त्यानंतर 2009 मध्ये उमरखेड-महागाव विधानसभा मतदार संघ हा अनुसूचीत जातींसाठी राखीव झाला.
  • आदरणीय खडसे साहेबांच्या सामाजिक कार्याची आणि त्यां च्या पत्नीने जिल्हापरिष अध्यक्ष असतांना केलेल्या विकास कामांची दखल घेत काँग्रेस पक्षाने त्यांना आमदारकीची उमेद वारी दिली. आणि या मतदार संघातील लोकांनी खडसे साहे बांना आमदार म्हणून विधानसभेत जाण्याची संधीही दिली..!
  • विजयराव खडसे साहेब आमदार झाले, त्यांच्या आमदारकी च्या कार्यकाळात उमरखेड-महागाव विधानसभेत अत्यंत महत्त्वाची कामे त्यांनी केले.
  • मतदार संघातील जवळपास प्रत्येक गावांत त्यांनी समाज मं दिरे बांधली, रस्ते बांधले,अशी अनेक विकासाची कामे त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत केली.
  • आणि विशेषतः ह्या माणसाच्या नावावर कुठलाही डाग नाही. कुठला आरोप नाही, कुठे भ्रष्ठाचार नाही. तशी त्यांची ती २००९ ते २०१४ पर्यंतची टर्म ही निष्कलंक राहिली..!
  • विजयराव खडसे साहेब आमदार असतांना ह्या माणसाने क धीच कोणाला दुखावले नाही, लहान मुलांपासून ते वयोवृद्धां पर्यँत ह्या माणसाने कधीच कोणाला अनादर असे शब्द काढले नाहीत.
  • नाहीतरी प्रत्येकाला आदराने बोलण्याची त्यांची सवयच म्ह णावी. मतदार संघातील कोणाच्याही घरी सुख-दुःखात धावून जाणे, होईल तशी त्याला मदत करणे, छोट्या-छोट्या गोष्टीं साठी लगेच उपलब्द होणे हा त्यांचा स्वभावच होता आणि आताही आहे..!
  • त्यानंतर 2019 ची निवडणूक आली, पण मतदार संघातील काही धनाड्य प्रस्थापितांना विजयराव खडसे हे वरचढ झाले होते. त्यांना ते झेपणारे नव्हते.
  • त्यामुळे उमरखेड तालुक्यात काँग्रेस पक्षात फार मोठी दुफ ळी निर्माण होऊन गटबाजी झाली. आणि ह्या गटबाजीचा फटका खडसे साहेबांना बसला.
  • तरीही खडसे साहेब मागे हटले नाही. त्यांनी त्यांची कॉंग्रेस प्रति असलेली तळमळ सुरूच ठेवली. याच काँग्रेसच्या अंतर्ग त गटबाजीमुळे,आणि काँग्रेस मध्येच असणाऱ्या त्या प्रस्तापी तांनी भाजपाला उघडपणे मदत करून फार कमी मताधिक्या ने खडसे साहेबांना पराभव केले..!
  • आता 2024 ची निवडणूक तोंडावर आली. खडसे साहेबांना रोखण्यासाठी/त्यांना तिकिटच मिळू नये यासाठी, तालुक्या तील काँग्रेसच्या काही प्रस्थापित लोकांनी अजून एक योजना राबवण्याचे ठरविले.
  • ज्या माणसाला कोणी ओळखत नाही, जो ह्या मतदार संघा तील रहिवाशी नाही, जो या जिल्ह्यातील मतदार देखील नाही.
  • ज्या व्यक्तीला आतापर्यँत कोणी पाहिले पण नव्हते, अशा व्यक्तीला पैशांच्या भरवश्यावर उमरखेड-महागाव विधानसभे च्या मैदानात उतरण्याचा प्रयत्न उमरखेड तालुक्यातील काही प्रस्थापित लोकं करतांना दिसताहेत..!
  • *उमरखेड-महागाव मतदार संघातील जनता फार हुशार आहे. या मतदार संघात करोडपती लोकं निवडणुकांना उभे राहता त, करोडो रुपये खर्च करतात.
  • पण तरीही ती लोकं निवडून येतं नाहीत. कारणं ह्या मतदार संघातील लोकं जागृत आहेत.ते पैशांना बळी पडणारे नाहीत.
  • कोणी कितीही आश्वासने देऊ देत, कोणी कितीही पैसा फेकू देत, तरीही या मतदार संघातील लोक अशा लोकांना उभे कर णारे नाहीत. हा इतिहास या मतदार संघाचा आहे..!
  • बांधवांनो या निवडणुकीत उमरखेड-महागाव मतदार संघात पैशांचा पाऊस पडणार आहे. वाटेल तेवढे पैसे या मतदार संघात वाटल्या जातील.
  • अनेक प्रकारचे आश्वासने इथल्या लोकांना दिले जातील, मी हे करतो-ते करतो, असं करू-तसं करू, अशी खुशालपणे बो लल्या जाईल. पण आम्हाला खात्री आहे, या मतदार संघा तील लोकं कशालाच बळी पडणार नाहीत..!
  • २०२४ च्या निवडणुकीत, जमीनिवर पाय असलेला, प्रत्येकां च्या सुख-दुःखात सामील होणारा, एका हाकेवर धावून येणा रा, कुठल्याही छोट्या-मोठ्या कार्यक्रमात हजर राहणारा, गोर -गरिबांच्या व्यथा जाणून घेणारा.
  • प्रत्येकाला आपलंसं वाटणारा, सर्वांना सांभाळून घेणारा, क धीही कोणत्याच गोष्टींचा गर्व न करणारा, आपला विजयराव खडसे यांना परत एकदा नव्याने आपल्या मतदार संघाचे नेतृ त्व करण्याची आपल्या मतदार माय-बाप संधी देतील अशी खात्री आणि विश्वास आहे..!
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा