नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , श्री.रामवरदायिनी देवस्थान ट्रस्टच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रातील गुणवंतांचा सन्मान. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

श्री.रामवरदायिनी देवस्थान ट्रस्टच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रातील गुणवंतांचा सन्मान.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतीनीधी : चिपळूण : प्रमोद तरळ :- श्री.रामवरदायिनी मं दिर देवस्थान ट्रस्ट, यांच्या वतीने मजरे दादर, कळकवणे येथे दसपटी विभागातील शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग यश संपादन के लेल्या श्री.समर्थ अविनाश शिंदे कळकवणे (आय.ए.एस),कु. हरिज्ञा लक्ष्मण शिंदे ओवळी (नेव्ही अधिकारी), श्री.अथर्व श्री धर कदम टेरव (सी.ए),कु.स्नेहा अरूण शिंदे कळकवणे (सी. ए) , श्री.शुभम शशिकांत शिंदे कोळकेवाडी (कबड्डी क्षेत्रात विशेष प्राविण्य),डॉ.सलोनी सुभाष शिंदे तिवरे (एम.बी.बी. एस ), श्री.कृपाल दिलीप शिंदे कोळकेवाडी (पी.एच.डी. डॉ क्टरेट परीक्षेत विशेष प्राविण्य), कु.अनुजा अनिल चव्हाण मोरवणे (डॉक्टरेट इन फिजिओथेरपी), श्री.निलेश कृष्णाजी शिंदे कळकवणे (वैद्यकीय क्षेत्रात विशेष पुरस्कार) प्राप्त केलेल्या या नवरत्नांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व दसपटी भूषण,दसपटीरत्न असे सन्मानचिन्ह देवून मान्यवरांच्या हस्ते नुकतेच सन्मानित करण्यात आले.
  • सदर किर्तींवंतांचा गौरव करताना न्यासाचे अध्यक्ष श्री.प्रताप राव शिंदे यांनी सांगितले की या गुणवंतांनी घेतलेले कठोर प रिश्रम, चिकाटी, सातत्य तसेच आईवडिलांचे व कुलस्वामिनी रामवरदायिनी- भवानीचे आशीर्वाद यामुळेच त्यांना हे घवघवी त यश प्राप्त झाले आहे.
  • यशस्वी विद्यार्थ्यांनी आपण आपल्या समाजाचेही काही देणे लागतो याचा विसर पडू देवू नये असा मोलाचा सल्ला दिला.
  • यावेळी गुणवंतांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की आ मचे गुणगौरव सोहळे अनेक झाले.
  • पण आई रामवरदायिनीच्या प्रांगणात आमच्या समाज बांधवां नी केलेला सन्मान आमच्यासाठी विशेष आहे व त्यामुळे आम्ही सर्व भारावून गेलो आहोत.
  • या सन्मान सोहळ्यास न्यासाचे विश्वस्त, व्यवस्थापन समिती, सल्लागार समिती, दसपटी क्रीडा मंडळाचे अध्यक्ष, सदस्य, दसपटी विभागातील मान्यवर तसेच आदरणीय समाज बांधव उपस्थित होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा