नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , शेतातील कामे आटोपून घरी येत असलेला ट्रॅक्टर पलटी….! सुदैवाने जिवितहानी टळली. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

शेतातील कामे आटोपून घरी येत असलेला ट्रॅक्टर पलटी….! सुदैवाने जिवितहानी टळली.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतिनिधी : यवतमाळ : सचिन कोयरे :- अकोला बाजार ते यवतमाळ मार्गावर असलेल्या सालोड गावाच्या फाट्या जव ळ भरधाव ट्रॅक्टर पलटी झाल्याची घटना रविवार 15 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता घडली असून सुदैवाने या अपघा तात कोणतीही जिवितहानी झाली नाही.
  • वरझडी येथील अनिल चौधरी यांच्या मालकीचा ट्रॅक्टर हा अकोला बाजार शेत शिवारात शेतामध्ये रोडा रोटर मारण्या साठी गेला होता.
  • शेतातील काम आटोपताच ट्रॅक्टर चालक मंथन चौधरी वय 23 वर्ष रा.वरझडी व त्याचा मित्र हे घराकडे ट्रॅक्टर भरधाव वेगाने घेऊन निघाले असता ट्रॅक्टर चालक मंथन याला वेग अनावर झाला, आणि पलटी होणार याची चुणूक चालकाच्या मित्राला येताच त्याने उडी मारली.
  • हा ट्रॅक्टर रोड च्या बाजूला असलेल्या 7 फुट नाली मध्ये पलटी झाला. यात चालक मंथन हा ट्रॅक्टर खाली पूर्णतः दबला गेला होता.
  • मित्राने आरडा ओरडा करून येणार्‍या जाणार्‍या वाटसरूच्या मदतीने चालक मंथनला बाहेर काढले आणि उपचारासाठी यवतमाळला पाठविले. सुदैवाने या अपघातात कोणतीच जिवितहानी झाली नाही.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा