नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , जिओचे नेटवर्क गायब; सोशल मीडियावर वापरकर्त्यांच्या तक्रारी – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

जिओचे नेटवर्क गायब; सोशल मीडियावर वापरकर्त्यांच्या तक्रारी

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतीनीधी : मयुर मांडलिक :- जिओ वापरकर्त्यांना सध्या इंटरनेट सुविधा वापरण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
  • रिलायन्सच्या जिओचे सर्व्हर डाऊन झाल्यामुळे जिओचे सिमकार्ड आणि इतर सुविधा वापरणाऱ्यांना नेटवर्क मिळत नाही आहे.
  • त्यामुळे हजारो वापरकर्त्यांनी त्यांची तक्रार सोशल मीडिया वर मांडली आहे. अद्याप याबाबत अधिकृत माहिती आलेली नाही.
  • मंगळवार, १७ सप्टेंबर रोजी सकाळी ११.१५ वाजताच्या सुमा रास जिओचे नेटवर्क गायब झाले. यानंतर इंटरनेटही बंद झा ल्याने लोकांनी तक्रार करण्यास सुरुवात केली. मुंबईतून १० हजाराहून अधिक लोकांनी नेटवर्क मिळत नसल्याची तक्रार केली आहे.
  • मोबाईलला सिग्नल मिळत नसल्याने कॉलिंग, मेसेजिंग अशा सुविधा वापरणे हि ग्राहकांना कठीण होऊन बसले आहे. शि वाय इंटरनेटही चालत नसल्यामुळे अनेकांची कामे खोळंबली आहेत. तर, अनेकांनी जिओ फायबर चालत नसल्याचे म्हटले आहे.
  • मुंबईसह देशभरात आज अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने गणप ती विसर्जन होत आहे. सकाळीच मुंबईतील मोठ्या मंडळा तील गणपती विसर्जनासाठी बाहेर पडले आहेत.
  • त्यामुळे लाखो गणेश भक्त विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी घराबाहेर पडले आहेत. अशावेळी जिओ सारख्या मोठ्या कं पनीचे नेटवर्क डाऊन झाल्यामुळे अनेकांना अडचणी उद्भवत आहेत.
  • एकमेकांना संपर्क करणे कठीण होऊन बसले आहे. शिवाय अनेक महत्त्वाच्या कामांचा खोळंबा झाल्याचे दिसून येत आहे.
  • सोशल मीडियावर याबाबत नाराजी व्यक्त होत आहे. अनेक ग्राहक कंपनीला टॅग करून लवकरच ही समस्या सोडवण्या ची मागणी करत आहेत.
  • काही ग्राहक यामुळे त्यांच्या कामावर परिणाम झाल्याची तक्रार करत आहेत. या नेटवर्क बंदमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
  • कंपनी कडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली ना ही. मात्र, तांत्रिक बिघाड हा यामागचे शक्यतो कारण असावे, असे तज्ज्ञांचे मत आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा