नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी घेतले श्री साईबाबा समाधीचे दर्शन. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी घेतले श्री साईबाबा समाधीचे दर्शन.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतिनिधी : मयुर मांडलिक :- अहमदनगर ( शिर्डी ) – राज्य पाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज श्री साईबाबा समाधी मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले.
  • त्यानंतर त्यांच्या हस्ते पूजा व आरती करण्यात आली. यावे ळी राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृ ष्ण विखे पाटील, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, श्री साई बाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, पोलीस अधीक्षक राकेश ओला, शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर उपस्थित होते.
  • यावेळी राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी द्वारकामाई व गुरस्था न मंदीराचेही दर्शन घेतले. साईबाबा संस्थानच्यावतीने श्री साईबाबांची मूर्ती देऊन राज्यपाल महोदयांचे स्वागत करण्यात आले.
  • तत्पूर्वी, राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे शिर्डी विमानतळा वर आगमन झाले. पालकमंत्री श्री. विखे पाटील यांनी जिल्ह्याच्यावतीने त्यांचे स्वागत केले.
  • यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर आदी उपस्थित होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा