
मुंबई महानगरपालिकेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर; गेल्या निवडणुकीप्रमाणेच २२७ प्रभाग कायम…!
- प्रतिनिधी : नितीन राणे :-राज्यातील रखडलेल्या स्थानि क स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लवकरच अपेक्षित असू न मुंबई महापालिकेने आगामी निवडणूकीसाठी प्रभागां च्या भौगोलिक सीमांबाबतचा प्रारुप आराखडा शुक्रवारी २२ ऑगस्ट रोजी रात्री जाहीर केला.
- या प्रारुप आराखड्यावर मुंबई महानगरपालिकेने नागरि कांकडून हरकती व सूचना मागवल्या आहेत. हरकती व सूचना सादर करण्यासाठी ४ सप्टेंबरपर्यंत मुदत आहे.
- मुंबईत २२७ प्रभागांची संख्या कायम ठेवण्यात आली असल्यामुळे २०१७ च्या निवडणूकीच्यावेळी जशी प्रभाग रचना होती त्यात यंदा फारसे बदल झालेले नाहीत.

- मात्र गेल्या काही वर्षांत मुंबईत अनेक नवीन बांधकामे झाली आहेत.
- सागरी किनारा मार्ग, अटल सेतू, मेट्रोची बांधकामे या सा ऱ्या गोष्टींचा या प्रभाग रचनेत समावेश करण्यात आला आहे.
- ही विकासकामे नक्की कोणत्या प्रभागात येतील त्याची नोंद या नव्या प्रारुप आराखड्यात देण्यात आली आहे.
- मुंबई महानगरपालिकेच्या २७ विभाग कार्यालयांतील कर निर्धारण व संकलन विभागाच्या कार्यालयात नागरिकांना आपल्या हरकती व सूचना नोंदवता येणार आहेत.
- मुंबई प्रमाणे महानगर क्षेत्रातील अन्य महापालिकांतील प्रभाग रचनाही जाहीर करण्यात आली मात्र त्याचे तपशील उपलब्ध झाले नाहीत.
- पुण्यात ४१ प्रभाग, १६५ नगरसेवक
- पुणे : पुणे महापालिकेच्या निवडणुकांसाठी प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाली असून, २०१७ च्या निवडणुकीच्या तु लनेत यंदा प्रभागाची संख्या एकने कमी होऊन ४१ झाली आहे.
- सदस्यांची संख्या एकने वाढून १६४ वरून १६५ वर पोहो चली आहे. चार सदस्यांचे ४० आणि पाच सदस्यांचा एक प्रभाग असणार आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











