
श्रीनाथ विद्यालयात भरला बालचमूंचा आनंदी बाजार.
- प्रतिनिधी : शकील मुलानी :- श्रीनाथ विद्यालय ज्युनिअ र कॉलेज व महात्मा फुले विद्यालय माळशिरस याठिका णी आनंदी बाजार भरवण्यात आला होता.

- कार्यक्रमाचे उद्घाटन मा.श्री.विकास दिंडुरे (पोलिस निरी क्षक माळशिरस) मा.डॉ.श्री.आप्पासाहेब देशमुख (मा.नग राध्यक्ष नगरपंचायत माळशिरस) मा.श्री.विजय देशमुख (नगराध्यक्ष नगरपंचायत माळशिरस) यांच्या हस्ते झाले.

- आनंदी बाजाराचा आनंद घेण्यासाठी सकाळपासूनच विद्यार्थी विविध पोशाखात साहित्य विकण्यास घेऊन आले होते.

- यामध्ये भाजी, फळे, फुले पासून खारेमुरे, शेव-चिवडा, भे ळ, वडापाव-भजी, पाणीपुरी, इडली, गुलाब जामुन, चहा यासारखे खाण्याचे पदार्थ होते.

- तर शालेय साहित्य पेन, वह्या, शालेय स्टेशनरी, कापडी पिशवी विक्रेता, फुगेवाला यांनी गर्दी खेचली.आपल्याकडे असलेल्या पदार्थांची विक्री करताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्या वर यावेळी आनंद ओसंडून वाहत होता.

- आपले साहित्य विक्रीसाठी अनेकांनी विविध प्रकारच्या जाहिराती, क्लुर्प्त्या केल्या होत्या.

- आनंदी बाजारात संस्थाध्यक्ष डॉ.आप्पासाहेब देशमुख यां नी स्वतः विद्यार्थ्यांकडून खरेदी करत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून ज्ञान आत्मसात करण्याची संधी दिली.

- काहीजण विद्यार्थी-पालक-शिक्षक-पाहुणे पाहण्यात-खा ण्यात दंग तर काहीजण बाजारचा मनसोक्त आनंद घेत झुंबड उडाली होती.

- या आनंदी बाजार उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण वि कासाला चालना, नाणी व नोटांची ओळख, प्रत्यक्ष व्यवहा र ज्ञान ,गणिती क्रिया वाढीस लागणे, स्वावलंबन हे गुण विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याच्या उद्देशाने विद्यालयाचे प्राचार्य योगेश गुजरे यांनी या उपक्रमाचे आयोजन केल्याचे सांगितले.

- या कार्यक्रमासाठी संस्थेचे संचालक महादेव माने, धनाजी देवकर, निलेश घाडगे, बाबासाहेब माने, रावसाहेब देशमु ख, विजय गोरड, हसन मुलाणी, आण्णासाहेब देशमुख, अनिरुद्ध शिंगाडे, मुख्याध्यापक मधूकर गुंड, प्राचार्य योगे श गुजरे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व परिसरातील बहुसंख्य पालक उपस्थित होते.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











