दीक्षा बागवे खून प्रकरणातील आरोपीला कडक शिक्षा व्हावी…! बागवे कुटुंबियांनी मा.आ.वैभव नाईक यांच्या समवेत जिल्हा पोलिस अधिक्षकांची भेट घेत केली मागणी.

  • प्रतिनिधी : नितीन राणे :- दीक्षा बागवे खून प्रकरण ही सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अत्यंत दुर्दैवी घटना आहे. यातील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा झाली तरच असे कृत्य करण्याची कोणाची हिंमत होणार नाही.
  • याप्रकरणी सखोल तपास करून आरोपीला कडक शिक्षा मिळण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी माजी आमदा र वैभव नाईक व बागवे कुटुंबियांनी सिंधुदुर्ग जिल्हा पोलि स अधिक्षक मोहन दहीकर यांच्याकडे केली आहे.
  • कुडाळ तालुक्यातील घावनळे येथील सतरा वर्षीय दीक्षा बागवे या युवतीचा निर्घृण खून करण्यात आला असून सं शयित आरोपी कुणाल कृष्णा कुंभार (रा. गोठोस मांडशेत वाडी) याने खुनाची कबुली दिली आहे.
  • याप्रकरणी बागवे कुटूंबियांनी मा.आ.वैभव नाईक यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली तसेच गुरुवारी मा. आ. वैभव नाईक यांच्या समवेत दीक्षा बागवे हिची बहिण प्रतिमा बागवे व योगेश कुबल यांनी सिंधुदुर्ग जिल्हा पोलि स अधिक्षक मोहन दहीकर यांची भेट घेत पोलिस तपासा बाबत माहिती घेण्यात आली.
  • याप्रसंगी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कुडा ळ तालुकाप्रमुख राजन नाईक उपस्थित होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles