
फर्ग्युसन कॉलेजमध्ये योग जागृती अभियान ; तरुणांना समतोल जीवनशैलीची अनुभूती.
- प्रतिनिधी : पिंपरी चिंचवड : नामदेव मेहेर :- श्री.योग वर्ग, वाकड यांच्या पुढाकाराने फर्ग्युसन कॉलेजमध्ये एक आठवड्याचा योग जागृती अभियान प्रभावीपणे राबवण्या त आला.

- या उपक्रमाने तरुण विद्यार्थ्यांना केवळ योगाचे शारीरिक फायदेच नव्हे, तर मानसिक, भावनिक आणि सामाजिक समतोलाची सखोल जाणीव दिली.

- दररोज दोन सत्रांमध्ये एक तासाचे प्रशिक्षण घेण्यात आले. प्रत्येक सत्रात विद्यार्थ्यांना स्ट्रेस म्हणजे काय, त्याचे प्रकार, स्त्रोत आणि उपाय यावर मार्गदर्शन करण्यात आले.

- त्यानंतर मूलभूत योगासने, श्वसन तंत्र, ध्यान, ॲक्युप्रेशर आणि आहार-विहार यावर सविस्तर माहिती देण्यात आली.

- श्रीप्रसाद देशमुख यांनी विद्यार्थ्यांना योगाचे तत्त्वज्ञान,जीव नातील उपयोग आणि भावनिक समतोल यावर मार्गदर्शन केले.

- त्यांच्या सहकारी हिमानी राऊत यांनी विविध आसने, प्रा णायाम आणि ॲक्युप्रेशरचे प्रात्यक्षिक सादर केले, ज्यामु ळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव घेता आला.
- विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांकडून दररोज प्रात्यक्षिके करून घेतली गेली.
- तसेच अनेक विद्यार्थ्यांनी योगामुळे मिळालेली मानसिक शांती, ऊर्जा आणि आत्मविश्वास याचा अनुभव शेअर केला.

- या उपक्रमाचा उद्देश तरुणांमध्ये योग आणि प्राणायामाचे महत्त्व अधोरेखित करणे होता.
- आजच्या तणावपूर्ण जीवनशैलीत योग हे केवळ व्यायाम नव्हे, तर एक जीवनदृष्टी आहे—ही जाणीव विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात आली.

- श्री.योग वर्ग, वाकड यांच्या सामाजिक बांधिलकीतून सा कारलेला हा उपक्रम तरुण पिढीला आरोग्यदायी, समतो ल आणि जागरूक जीवनशैलीकडे वळवण्याचा एक प्रेर णादायी टप्पा ठरला आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











