
वाचनाने माणूस समृद्ध होतो – नवेश पाटील.
- प्रतिनिधी : शिवाजी अंबिके :- विद्यार्थ्यांनी नियमित वा चन करावे,वाचनानेच माणूस समृद्ध होतो. पुस्तक मस्तक घडवते आणि ते मस्तक अयोग्य ठिकाणी नतमस्तक होत नाही. असे मत नवेश पाटील यांनी व्यक्त केले.

- मॉडर्न हायस्कुल निगडी येथे राष्ट्रपती अब्दुल कलाम यां च्या वाढदिवसानिमित्त आयोजित वाचन प्रेरणा दिन कार्य क्रमप्रसंगी ते बोलत होते.
- यावेळी मुख्याध्यापिका शारदा साबळे, पर्यवेक्षक विजय पाचारणे,शिवाजी अंबिके,मीना अधिकारी,मनीषा बोत्रे, सु नंदा खेडेकर,अमृता गायकवाड,जयश्री चव्हाण उपस्थित होत्या.

- नवेश पाटील म्हणाले, डॉक्टर ए.पी.जे.अब्दुल कलाम यां नी त्यांच्या आयुष्यामध्ये वाचनाला अनन्यसाधारण महत्त्व दिले होते.
- डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे वाचन तर सर्वश्रुत आहे. आ पल्या ग्रंथांना ठेवण्यासाठी त्यांनी राजगृह नावाची एक स्वतंत्र इमारत बांधली.

- कसे वाचावे,कधी वाचावे आणि काय वाचावे यासाठी चिं तन करण्याची आवश्यकता आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शिवाजी अंबिके यांनी केले.

- उपक्रमाचे कौतुक कार्याध्यक्ष प्रा.डॉ.गजानन एकबोटे, का र्यवाह प्रा.शामकांत देशमुख,सहकार्यवाह प्रा.डॉ.ज्योत्स्ना एकबोटे, उपकार्यवाह प्रा.डॉ.निवेदिता एकबोटे, शाळा स मिती अध्यक्ष प्रा.मानसिंग साळुंके,व्हिजिटर प्रमोद शिंदे, राजीव कुटे यांनी केले.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











