देशी बनावटीचा कटटा घेवुन फिरणाऱ्या इस्माला अटक पोलीस स्टेशन बिटरगांव ची कार्यवाही.
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
- प्रतिनिधी : यवतमाळ : इरफान शेखजी शेख :- यवतमाळ जिल्हात वाढत्या गुन्हयांना प्रतिबंध करण्यासाठी व घडलेले गुन्हे उघडकीस आणण्या करीता मा.पोलीस अधिक्षक यवत माळ यानी विशेष मोहीम राबवुण अवैध शस्त्र बाळगणा-या गुन्हेगारावर कार्यवाहीचे आदेशीत केल्यावरून त्या अनुसगांने मोहीम राबवित असताना सैयद तौसीफ उर्फ तौश्या सैयद ख लील हा ढाणकी ते सोईट रोडवर एक देशी बनावटीचा कटटा घेवुन फिरत असल्याचे गुप्त माहिती वरून त्याला ढाणकी ते सोईट रोडवर ताब्यात घेवुन त्यांची अगंझडती घेतली असता अगंझडती मध्ये एक देशी बनावटीची पिस्टलची किंमत अं. ५०,००० रू व १ जिवंत काडतुस किमंत २००० रू असा एकुण ५२,००० रू चे अग्नीशस्त्र व काडतुस विनापरवाना बेकायदे शीर रित्या मिळुन आले. पोहेकॉ रवि गिते यांचे फिर्याद वरून पोलीस स्टेशन बिटरगांव येथे आर्म अॅक्ट सहकलम १३५ मपोका प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
- यापुर्वी सैयद तौसीफ उर्फ तौश्या सैयद खलील हा ढाणकी हा गुंड प्रवृतीचा असुन त्याचेवर गंभीर १० गुन्हयाची नोंद आहे.
- सदर ची कार्यवाही कुमार चिंता पोलीस अधिक्षक यवतमाळ, डॉ.पियुष जगताप अपर पोलीस अधिक्षक यवतमाळ, हनुमंत गायकवाड उपविभागीय पोलीस अधिकारी उमरखेड संतोष मनवर ठाणेदार, पोउपनि शिवाजी टिपुर्णे, पोहेकॉ रोशन सर नाईक, पोना देविदास हाके, पोकॉ निलेश भालेराव, दत्ता कु सराम व चालक राहुल कोकरे यानी केली.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space