नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , मुंबई-पुणे मार्गावर धावणार 100 शिवाई बस; एसटीच्या ताफ्यात दोन महिन्यात दाखल होणार 150 इलेक्ट्रिक बस – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

मुंबई-पुणे मार्गावर धावणार 100 शिवाई बस; एसटीच्या ताफ्यात दोन महिन्यात दाखल होणार 150 इलेक्ट्रिक बस

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • रिपोर्टर: न्यूज रूम ऑपरेटर : सर्वसामान्य नागरिकांमध्ये ‘शिवाई’ बसची लोकप्रियता वाढवण्यासाठी त्यांना एशियाड बसेसचा लूक देण्याचा एसटी महामंडळाचा प्रयत्न आहे.
  • केंद्राच्या फेम 2 अंतर्गत पुढील दोन महिन्यांच्या कार्यकाळात एसटी महामंडळात 150 इलेक्ट्रिक बसेस दाखल होतील. ठाणे-पुणे , दादर-पुणे , नाशिक-पुणे  , कोल्हापूर-स्वारगेट , औरंगाबाद-शिवाजीनगर, पुणे-बोरीवली या मार्गांवरही शिवाई बस धावणार आहे. ‘शिवाई’ बसचं मुंबई-पुणे प्रवासाचं भाडं 350 रुपये असण्याची शक्यता आहे.
  • प्रवासाचा खर्च कमी होणार
  • मुंबई-पुणे प्रवासासाठी शिवनेरी बसच्या तिकीटाचा खर्च साधारण 450-500 रुपये येतो. त्यामुळे सर्वसामान्य जनतेसाठी ही रक्कम मोठी असते. पेट्रोलचे भाव वाढल्याने अजून या तिकीटांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
  • मात्र नव्याने रुजू झालेली शिवाई ही  इलेक्ट्रिक बस आहे. त्यामुळे याचे तिकीटदर कमी असणार आहे. साधारण 300-350 रुपये तिकीट भाडं असण्याची शक्यता आहे.
  • पुणे-नगर मार्गावर पहिली शिवाई धावली
  • 1 जुन 2022 रोजी पुणे-नगर मार्गावर पहिली इलेक्ट्रिक बस शिवाई  धावली. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या  हस्ते या बसचे पुण्यातील स्वारगेट बसस्थानकावर उद्घाटन करण्यात आलं. पुने नगर मार्गावर इलेक्ट्रिक बस सुरु केल्यानंतर एसटी महामंडळाने हा निर्णय घेतला आहे.
  • पुढील दोन वर्षात एसटी महामंडळाच्या ताफ्यात मोठ्या प्रमाणात शिवाई बसेस दाखल होणार आहेत.
  • प्रत्येक जिल्ह्यात शिवाई धावणार असा एसटी महामंडळाचा विचार आहे. सर्वाधिक चालणाऱ्या मार्गावर शिवाई बस अधिक प्रमाणात चालवल्या जाणार आहे.
  • ‘जिथे गाव, तिथे एसटी’ अशी संकल्पना अनेक वर्षांपुर्वी एसटी महामंडळाने राबवली होती. त्यानुसार आज प्रत्येक गावागावात एसटी सहज बघायला मिळते.
  • पेट्रोलच्या किमतीने उच्चांक गाठला आहे. त्यामुळे येत्या काळात एसटीच्या दरात देखील वाढ होण्याची शक्यता आहे.
  • मात्र येत्या काळात या इलेक्ट्रिक बसचा सर्वसाधारण नागरिकांना फायदा होणार आहे. तिकीटांच्या दरात देखील तफावत जाणवण्याची शक्यता आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा  https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा