नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , सांगली जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी बुडवला ८४ कोटी ७८ लाखांचा कर; गुन्हा दाखल – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

सांगली जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी बुडवला ८४ कोटी ७८ लाखांचा कर; गुन्हा दाखल

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • महाराष्ट्र मूल्यवर्धित कर कायदा २००२ अंतर्गत सर्व गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. याप्रकरणी राज्य कर निरीक्षक विनीत सर्जेराव पाटील (वय ३७, रा. चिंतामणीनगर, सांगली) व दरिबा शंकर गलांडे (रा. गावभाग सांगली) यांनी इस्लामपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या तिघांही थकबाकीदारांनी वारंवार पाठपुरावा करूनही थकबाकी भरली नाही.
  • फेब्रुवारी २०१२ मध्ये त्यांना पोलिस अभियोग प्रस्तावाबाबतची कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती.
  • त्यालाही त्यांनी प्रतिसाद दिला नाही. दरम्यानच्या काळात महाराष्ट्र शासनाने अभय योजना २०२२ जाहीर केली.
  • या योजनेचा फायदा घेण्याच्या सूचना केल्यानंतरही त्याकडेही त्यांनी दुर्लक्ष केले. अखेर विक्रीकर विभागाच्या राज्यकर सहआयुक्त (कोल्हापूर) सुनीता थोरात यांच्या मार्गदर्शनानुसार मंगळवारी उपायुक्त सुनील कानगुडे व संजय माने (सांगली) यांनी गुन्हा दाखल केला.
  • देशमाने (रा. पुणे बंगळूर रोड, पेठ, ता. वाळवा) यांचा खाद्यतेल विक्रीचा व्यवसाय आहे. देशमाने यांच्यावर ३६.७२ कोटी, १.४२ कोटी, सौ. देशमाने यांच्यावर २९.७३ कोटी, तर महेशकुमार जाधव (रा. पाण्याची टाकीजवळ, पेठ) यांच्यावर १६.९० कोटी कर थकवल्याचा आरोप आहे. २०१२ पासूनची ही प्रकरणे आहेत.
  • …तर कारवाई अटळ
  • महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाअंतर्गत प्रलंबित थकबाकी वसुलीची मोहीम सुरू आहे. सांगली जिल्ह्यातील मोठ्या थकबाकीदारांवर गुन्हे दाखल केले जात आहेत.
  • कोल्हापूर विभागातील सर्व मोठ्या व्यापाऱ्यांनी त्यांच्याकडील थकबाकीचा भरणा तातडीने करावा अन्यथा कारवाई अटळ असल्याचा इशारा कोल्हापूर विभागाचे राज्य कर सह-आयुक्त सुनीता थोरात यांनी दिला आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा  https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा