आईच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ जि. प. कार्ला शाळेला 11000 रु ची देणगी भेट.

  • प्रतिनिधी : धनंजय गोफने :- स्व.त्रिशला अर्जुन झिरपे यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ त्यांचे सुपुत्र श्री अण्णासाहेब अर्जुन झिरपे यांनी शाळेला आज रोख 11000 रुपयांची देणगी दिली सप्रेम भेट.
  • “मायेची गेली सावली, करुणेचा हरवला सागर. उरली नाही साथ आम्हाला आठवण येते क्षणा क्षणाला.”
  • या उक्तीप्रमाणे स्वर्गीय आपल्या आईची आठवण म्हणून आपल्या आईच्या प्रथमपुण्य स्मरणार्थ श्री अण्णासाहेब अर्जुन झिरपे यांनी कार्ला शाळेला अनोखी अशी रोख स्व रूपात 11000 रुपयांची देणगी उदार अंतःकरणाने सुपूर्त केली.
  • जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कार्ला तालुक्यातील एक आदर्श अशी शाळा नावारुपाला आलेली आहे.
  • आपल्या गावाची सुंदर शाळा पाहून शाळेतील सर्व विद्या‌ र्थ्यांना उपयोगी पडेल अशी वस्तू खरेदी करण्यासाठी त्यां नी आपल्या आईच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ रोख 11000 रुपये मुख्याध्यापक श्री.संजीवन गायकवाड यांच्याकडे सुपूर्द केली.
  • या रकमेची एक वस्तू शाळेला खरेदी करा असा मानस त्यांनी या निमित्ताने व्यक्त केला. स्व.त्रिशला यांच्या अनेक आठवणी त्यांनी या निमित्ताने त्यांच्या आठवणींना उजा ळा दिला.
  • गावातील शाळा हे शिक्षणाचे मंदिर असून इथूनच भवि ष्यामध्ये गावातील यशस्वी विद्यार्थी घडणार आहेत या हेतूने विद्यार्थ्यांना व शाळेला उपयोगी होईल अशी वस्तू खरेदी करा अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
  • खरं तर इतर गोष्टीवर होणारा अपव्यय खर्च याला फाटा देत श्री अण्णासाहेब झिरपे यांनी एक आदर्श विचार कृती तून निर्माण केला आहे.
  • या रोख रकमेची एक सुंदर अशी भेटवस्तू आम्ही लवकर च खरेदी करतोअशी भावना मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांनी व्यक्त केली.
  • यावेळी हैबत शिंदे,रामभाऊ धारणकर, जिंकू शिंदे, सचिन मिस्किन, संतोष भुजे, दिनकर झिरपे, सुनिल झिरपे, बापू भुजे, राजाभाऊ झिरपे, सुहास झिरपे, माधव शिंदे, गणप‌ ती भालेकर, कैलास झिरपे,शेषराव भोरे,भारत पवार, सु भाष झिरपे, सोमनाथ झिरपे, हरी झिरपे, सुब्राव झिरपे, अं गणवाडीच्या सुलभा शिंदे,आशाबाई राऊत, पोषण आहार संगीता झिरपे तसेच मुख्याध्यापक श्री गायकवाड,शिक्षक श्री खरात, लोकरे,पिंगळे, बनकर, श्रीम कोकाटे उपस्थित होते.
  • अण्णासाहेब झिरपे यांनी आदर्श विचार कृतीतून उतरव ल्याबद्दल गावकऱ्यातून त्यांचे कौतुक होत आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles