
परंडा तालुक्यातील पूरग्रस्त शाळांना आधार देण्यासाठी धावले सांगलीचे जनरल मेडिकल प्रॅक्टिशनर्स फोरम.
- प्रतिनिधी : धनंजय गोफने :- दि. 16/10/2025 रोजी जनरल मेडिकल प्रॅक्टिशनर्स फोरम, सांगली या आपल्या संस्थेच्या माध्यमातून मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्या तील परंडा तालुक्यातील आठ पूरग्रस्त शाळेतील सर्व मु लांना स्पोर्ट किटचे वाटप केले.
- परांडा तालुक्यामधील लोहारा, करंजा, बुकी, शेळगाव, रु ई, देऊळगाव, देवगाव, चिंचपूर येथील जिल्हा परिषद शा ळेमधील एकूण ४१३ मुलांना आपण आपल्या संस्थेतर्फे स्पोर्ट्स किट वाटप करणार आहोत.

- (प्रातिनिधिक स्वरूपात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवगाव आणि लोहारा या शाळांना वाटप केले आणि उर्व रित शाळांना दिवाळीनंतर वाटप होईल…)
- यामध्ये आठ शाळा शाळेतील 413 विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ होणार आहे.

- या वाटपावेळी संस्थेचे विद्यमान विश्वस्त मंडळ अध्यक्ष डॉ.आनंद पोळ, विश्वस्त खजिनदार डॉ. देवपाल बरगाले तसेच संस्थेच्या विद्यमान कार्यकारिणी अध्यक्ष डॉ.सौ. अ निता पागे मॅडम व कार्यकारिणी सदस्य डॉ.अमर पागे प्रत्यक्ष उपस्थित होते.
- मराठवाडा हा तसा दुष्काळी भाग अठरा विश्व दारिद्र्य ब हुज्तांशी लोकांच्या पाचवीलाच पुजलेलं… रोजचा जीवन मरणाचा संघर्ष करणाऱ्या या लोकांवर 22 सप्टेंबर 2025 रोजी अस्मानी संकट कोसळले.

- जिथे पाण्याची वाणवा तिथे एका रात्रीत काही तासांमध्ये 100 मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस पडला. ही घटना त्यां च्या दृष्टीने अनपेक्षित आणि अनाकलनीय होती.
- त्यामुळे त्यांना स्वतःला सावरायची संधीच मिळाली नाही. अशावेळी अंगावरच्या कपड्यांनिशी त्यांना बाहेर पडावं लागलं.. चार आठ दिवसानंतर ज्यावेळी ते घरी परतले त्यावेळी होत्याचं नव्हतं झालं होतं.

- या अनपेक्षित धक्क्यामुळे केवळ आर्थिक नाही तर मान सिक खच्चीकरण देखील या लोकांचं झालेलं आहे.
- २०१९ मध्ये ज्यावेळी आपल्या पश्चिम महाराष्ट्रावर पुराचे संकट आले त्यावेळी मराठवाडा आपल्यासाठी धावून आला होता.
- त्यांच्या मदतीमुळे आपल्याला देखील केवळ आर्थिक ना ही तर मानसिक उभारी देखील मिळण्यास मदत झाली होती.

- अशावेळी केलेली एक छोटीशी मदत देखील त्यांना मान सिक उभारी देऊ शकते.
- याचीच जाणीव ठेवून सध्या मरा ठवाड्यातील जनतेला आपल्या कडून आर्थिक आणि मानसिक आधाराची गरज आहे हे ओळखून पूरग्रस्तांसाठी मदती साठी आपण केले ल्या आव्हानाला आपल्या सदस्यांनी भरभरून प्रतिसाद दिला.
- मदत गोळा होत होती पण नेमकी कोणत्या स्वरूपात मद त करायची हे निश्चित होत नव्हते.

- त्याचवेळी माझ्या कॉ लेजचे ज्येष्ठ सहकारी डॉक्टर मंदार पंडित (परांडा) यांना मी फोनवर संपर्क केला व त्यांना आ म्ही करू इच्छिणाऱ्या मदतीची कल्पना दिली व ही मदत योग्य त्या ठिकाणी दिली जावी अशी तळमळ व्यक्त केली.
- त्यांनी देखील तेथील एक अतिशय तत्पर व नेहमी दुसऱ्यां च्या मदतीला हजर असणारे जिल्हा परिषद शाळेचे कार्य तत्पर शिक्षक श्री.रवी कापसे सर यांच्याशी संपर्क साधला.

- कापसे सरांची शाळा पूरबाधीत नव्हती पण तरीदेखील ते थे आसपास असणाऱ्या सर्व पूर बाधित शाळांना संपर्क साधून नेमकी कोणती मदत तेथे अजून पोहोचली नाही व कशाची सर्वात जास्त गरज आहे याची माहिती त्यांनी घेतली.
- त्यांचं मायक्रो नियोजन बघितलं आणि एखादा माणूस ए खाद्या समाज कार्यासाठी किती झपाटलेला असू शकतो याची प्रचिती आली.

- आपण देखील सुरुवातीला काय मदत द्यायची याबाबत वेगवेगळ्या पर्यायांचा विचार केला. उदाहरणार्थ औषधांचे किट,वैद्यकीय सुविधा, संसार उपयोगी साहित्य, पशुखाद्य, दिवाळी किट, शाळांसाठी स्मार्ट टीव्ही इत्यादी..
- पण हे सर्व तिकडे पोहोचवण्यासाठी ट्रान्सपोर्टचा खर्च सा धारणपणे 15 ते 18 हजार पर्यंत येत होता. त्यामुळे हा ट्रा न्सपोर्टचा खर्च टाळून काही करता येईल का यावर आम्ही विचार करत होतो.

- त्याचवेळी कापसे सरांनी आमच्याकडच्या आठ शाळेतील 413 मुलांना स्पोर्ट्स युनिफॉर्म देता येईल का याबाबत वि चारणा केली. कार्यकारीणी मध्ये यावर चर्चा करून आम चेही त्यावर एकमत झाले.
- तसेच त्या युनिफॉर्मवर समोरच्या बाजूला आपल्या संस्थे चा लोगो व संस्थेचे नाव प्रिंट करून घेतले तर किमान दो न वर्ष तरी त्या भागात आपल्या संस्थेचे नाव नियमितपणे लोकांच्या स्मरणात/चर्चेत राहील याची खात्री झाली.
- पण आपण सभासदांनी जमवलेला फंड वीस ते पंचवीस हजार रुपये अजून कमी पडत होता.

- यासाठी विश्वस्त सचिव डॉक्टर अपेक्षा महाबळेश्वरकर यांनी पुढाकार घेतला व स्वतः पंधरा ते वीस सभासदांना फोन करून त्यांच्याकडून हा पुढील फंड त्यांनी जमवला.
- सर्व विद्यार्थ्यांना आपण हा युनिफॉर्म पुरवू शकतो याची खात्री झाल्यानंतर आपण तसा निरोप श्री कापसे सर यांना दिला.
- तेथून पुढील सर्व धुरा कापसे सर व डॉक्टर मंदार पंडित यांनी आपल्या खांद्यावर घेतली त्या शाळांना नियमितपणे युनिफॉर्म पुरवणाऱ्या तेथील स्थानिक दुकानदाराशी संप र्क साधून सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या साईज प्रमाणे युनिफॉर्म आणून घेतले.
- तसेच त्यावर मागील बाजूस शाळेचे नाव व पुढील बाजूस आपल्या संस्थेचा लोगो व नाव प्रिंट करून घेतले व हे सर्व युनिफॉर्म त्या त्या शाळेच्या शिक्षकांनी त्यांच्याकडून त्यां च्या शाळेमध्ये जमा करून घेतले.

- यासाठी आपण गृहीत धरलेला 15 ते 18000 हा ट्रान्सपो र्टचा खर्च वाचला व त्याचा वापर तेथील सर्व विद्यार्थ्यांना युनिफॉर्म वाटण्यासाठी झाला.
- प्रत्यक्ष शाळेत गेल्यानंतर तेथील परिस्थिती भयानक हो ती. शाळांना मदत येत आहे पण ती अजूनही तोकडी आ हे याची जाणीव होत होती.
- अशावेळी पूर्वी कधीही न मिळालेला स्पोर्ट्स युनिफॉर्म घा लून मुले आनंदाने आमच्यासमोर बसली होती आणि त्यां च्यामध्ये एक वेगळाच उत्साह व त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
- आपण जमवलेल्या पैशाचा सदुपयोग झालेला आहे याची जाणीव आम्हाला सुद्धा पदोपदी होत होती.
- डॉक्टर अमर पागे व डॉक्टर देवपाल बरगाले यांनी विद्या र्थ्यांची संवाद साधत त्यांच्याकडून कविता म्हणून घेतल्या व त्यांचा उत्साह द्विगुणित केला.
- मी व डॉ.सौ.अनिता पागे यांनी आपापली मनोगते व्यक्त करताना आपली संस्था करत असलेल्या विविध सामाजि क कार्याची, उपक्रमांची माहिती त्यांना दिली व मराठवा ड्यातील लोकांनी 2019 मध्ये आपल्यालाही भरपूर मदत केली होती याचा उल्लेख केला.
- त्यानंतर शाळेने आपल्या संस्थेसाठी एक आभार पत्र आम्हाला दिले.
- हा सर्व उपक्रम राबवताना संस्थेने केलेल्या आवाहनाला सभासदांनी देखील भरभरून प्रतिसाद दिला.
- त्यामुळे मराठवाड्यातील पूरग्रस्त भागातील शाळेला व शाळेतील मुलांना मदत करणे आपल्याला शक्य झाले.
- या उपक्रमासाठी केवळ संस्थेच्या सभासदांनीच नाही तर बाहेरील डॉक्टर व मित्रमंडळीने देखील मदत केली.
- या उपक्रमाच्या नियोजनासाठी कार्यकारिणी सदस्यांनी देखील वेळोवेळी मीटिंगमध्ये येऊन निर्णय प्रक्रियेत सहभाग घेतला. त्यांचे व इतर सर्व ज्ञात अज्ञात सदस्यांचे मनापासून आभार.

- परंडा मधून बाहेर निघताना आपण केलेली मदत तोकडी आहे याची जाणीव होत होती पण तरीदेखील त्या मुलां च्या चेहऱ्यावरील अमर्यादित हास्य मनाला खूप समाधान देत होते व आपण केलेली योग्य ठिकाणी गरजू मुलांना पोचली याची प्रचिती पदोपदी येत होती.
- पुन्हा एकदा या उपक्रमासाठी मदत केलेले सर्वांचे मनापासून आभार… 🙏🙏🙏🙏
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











