इस्क्रा फाऊंडेशन तर्फे ‘ज्ञानाई सार्वजनिक वाचनालय’चे भव्य उद्घाटन सपन्न.

  • प्रतिनिधी : हिराजी देसले :-कोठारे ता.शहापूर, जि.ठाणे शिक्षण, आरोग्य, महिला सबलीकरण, पर्यावरण संवर्धन आणि समाजविकास या क्षेत्रांत कार्यरत असलेल्या ‘इस्क्रा फाऊंडेशन’ या सामाजिक संस्थेच्या वतीने कोठारे गावात ‘ज्ञानाई सार्वजनिक वाचनालय’ या उपक्रमाचे भव्य उद्घाट न नुकतेच संपन्न झाले.
  • या प्रसंगी संस्थेच्या वतीने गावातून अनोखी ‘पुस्तक दिंडी’ काढण्यात आली. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ ग्रामस्थांप र्यंत सर्वांनी उत्साहाने सहभाग नोंदवत वाचन संस्कृतीचा संदेश दिला.
  • दिंडीदरम्यान “वाचा – वाढा – उजळा” अशा घोषणांनी गावाचे वातावरण भारावून गेले. कार्यक्रमाची सुरुवात जिल्हा परिषद शाळा, कोठारे येथे वाचनालयाचे उद्घाटन करून करण्यात आली.
  • या सोहळ्याचे उद्घाटन गावाचे सरपंच चंद्रकांत दरोडा, पोलीस पाटील अरुण उबाळे, तसेच संस्थेचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ यांच्या हस्ते पार पडले.
  • विशेष आकर्षण ठरले ते लहान मुलगी केतकी देसले हिचे पुस्तकातील एक भाग वाचून केलेले उद्घाटन – ज्यामुळे उपस्थित सर्वांच्या टाळ्यांचा कडकडाट झाला.
  • उद्घाटन प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हरी देसले म्हणा ले, इस्क्रा फाऊंडेशन समाजातील प्रत्येक घटकाला एकत्र आणून शिक्षण आणि ज्ञानाच्या माध्यमातून सर्वांगीण वि कास घडवण्याचा प्रयत्न करत आहे.
  • ‘ज्ञानाई वाचनालय’ हा त्या दिशेने घेतलेला एक छोटा पण अर्थपूर्ण पाऊल आहे.
  • त्याचप्रमाणे संस्थेचे संस्थापक चेतन कांबळे यांनी आप ल्या भाषणातून वाचनाची सवय आणि पुस्तकांशी नाते जोपासण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
  • संस्थेच्या सचिव प्रगती कांबळे यांनी महिलांसाठी आणि मुलींसाठी आयोजित रांगोळी स्पर्धेची माहिती दिली.
  • यावेळी सरपंच चंद्रकांत दरोडा आणि पोलीस पाटील अ रुण उबाळे यांनी वाचनालयाच्या पुढील विकासासाठी आ वश्यक ते सहकार्य देण्याचे आश्वासन दिले.
  • तर गावातील उच्चशिक्षित तरुण योगेश देसले यांनी वाच नालयाच्या कामकाजात सातत्याने मार्गदर्शन करण्याचे आश्वासन दिले.
  • कार्यक्रमाचे समन्वयक संस्थेचे खजिनदार प्रतीक जगताप यांनी सर्वांचे आभार मानले.
  • कार्यक्रमास अक्षय लखांबरे, भूषण देसले, किसन विशे, राहुल बनसोडे, प्रतीक जगताप, अर्जुन बनसोडे, कस्तुरी जाधव, अस्मिता कहाळे, गायत्री भांगरे, प्रेमलता कोडगो ळी, अक्षया जगताप आदी कार्यकर्ते, ग्रामस्थ व मित्रपरि वार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
  • शेवटी संस्थेच्या पदाधिकारी श्वेता पाटील यांनी सांगितले की, वाचनालय हे केवळ पुस्तकांचे ठिकाण नसून, गावा च्या प्रगतीचा पाया आहे. इस्क्रा फाऊंडेशन भविष्यात अशा अनेक उपक्रमांद्वारे ग्रामीण भागात ज्ञानप्रकाश पसरवणार आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles