
राजापूर तालुक्यातील बागवेवाडी येथील बीएसएनएल टॉवर अखेर जनतेसाठी खुला.
- प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :-तालुक्यातील मौजे बागवेवाडी येथील बीएसएनएल (BSNL) टॉवर अखेर ग्रा मस्थ आणि पंचक्रोशीतील नागरिकांसाठी सुरू झाला अ सून आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
- कित्येक वर्षापासून नेटवर्कसाठी वंचित असलेल्या बागवे वाडीने बीएसएनएल टॉवरच्या रूपाने विकासाचे अजून एक पाऊल टाकले आहे.

- विद्यमान आमदार मा.श्री.किरणजी सामंत आणि जिल्हा धिकारी मा.श्री.देवेंदरजी सिंह यांनी तालुक्यातील मोबाई ल नेटवर्क तातडीने करावे असे अधिकाऱ्यांना सांगितले.
- गावातील ग्रामस्थ बालमित्र मंडळाचे अध्यक्ष श्री कमलेश गांगण यांनी लगेचच माहिती घेत मा.श्री.किरण सामंत तसेच जिल्हाधिकारी रत्नागिरी, राजापूर यांच्याकडे धाव घेतली आणि कामाचा पाठपुरवठा करत तातडीने सर्वे करण्यास सांगितला.
- सरपंच कु.नीलमताई हातणकर यांनी लागणारी कागदपत्रे वेळोवेळी राजापूर कार्यालयामध्ये सुपूर्द केली आणि स्था निक ग्रामस्थांशी संपर्क साधला.
- सदर सर्व प्रक्रियेमध्ये श्री.प्रशांत कुलकर्णी बी.एस.एन. एल अधिकारी, सौ.अदिती नार्वेकर मॅडम (भू कर मापक अधिकारी),श्री.रसाळ सर (बी.एस.एन.एल अधिकारी र त्ना. डिव्हिजन ), श्री शिरसाट सर (रत्ना. डिव्हिजन), बाग वेवाडी उत्कर्ष मंडळ मुंबई व ग्रामस्थ यांचे मोलाचे सहका र्य लाभले.
- मुंबईस्थित आणि गावातील सर्व ग्रामस्थ उपसरपंच श्री शिवरामजी कामतेकर, मुंबई मंडळ अध्यक्ष श्री.संतोष शे ट्ये, सचिव श्री विजय पांचाळ, श्री दशरथ कामतेकर, ग्रा. सदस्य सौ.तनुजा बावकर,मा.तंटामुक्ती अध्यक्ष श्री संजय रोडे ,श्री योगेश हातणकर, श्री संतोष कामतेकर ,श्री संभा जी कुळये,माजी ग्रा.पं.सदस्य श्री.अनंत बावकर, श्री राजें द्र आगटे ,श्री महेश पांचाळ ,श्री मनोज पांचाळ ,श्री प्रमोद आगटे , श्री मकरंद गांगण , श्री वासुदेव चौगुले,श्री अशोक शेट्ये, श्री चंद्रकांत बावकर, श्री अनंत कामतेकर आदी सर्वांचे सहकार्य लाभले.
- सर्वेसाठी लगतचे जमीन मालक श्री रोहन मसुरकर , श्री संतोष आगटे, श्री प्रवीण कामतेकर यांनी सुद्धा मोलाचं योगदान दिले.
- आमदार श्री किरणजी सामंत तसेच सर्व अधिकारी वर्ग, मुंबईस्थित आणि स्थानिक ग्रामस्थ यांच्या सहकार्याबद्दल यावेळी आभार मानण्यात आले.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/









