शहापूर तालुक्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान.

  • प्रतिनिधी : हिराजी देसले :- शहापूर, ता. 26 ऑक्टोबर – शहापूर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू अस लेल्या परतीच्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुक सान झाले आहे.
  • सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी भाताचे पीक आडवे पडले असून, कापलेले पीक पूर्णपणे भिजल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.
  • तालुक्यातील सर्व परिसरात पाऊस वादळी वाऱ्याचा जोर अधिक असल्याने शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले आहे.
  • आधीच उत्पादन खर्च वाढल्याने त्रस्त असलेल्या शेतक‌ ऱ्यांना आता या पावसाने अधिकच आर्थिक फटका बस ला आहे.
  • अनेक शेतकऱ्यांनी सांगितले की, पिके कापणीच्या टप्प्या वर असतानाच हा अवकाळी पाऊस आल्याने दाणे काळे पडले, धान्याचे वजन कमी झाले आणि विक्रीयोग्य उत्पाद न घटले आहे. काही ठिकाणी घरात व कोठारात साठव लेले धान्यही ओले झाले आहे.
  • शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तात्काळ पंचनामे करून योग्य नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी केली आहे.
  • हवामान खात्याच्या माहितीनुसार पुढील काही दिवस हल क्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता अस ल्याने शेतकऱ्यांची चिंता अधिक वाढली आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles