निवृत्तीनंतर लष्करी कुत्र्यांचे काय होते? त्यांना खरोखर गोळ्या घातल्या जातात का….?
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
- रिपोर्टर: न्यूज रूम ऑपरेटर : हा माणसाचा सर्वात विश्वासू मित्र आहे, असे म्हटले जाते. शत्रूचा शोध घेण्यासाठी भारतीय लष्करही याचा वापर करते.
- भारतीय लष्कर निवृत्तीनंतर आपल्या कुत्र्यांना आणि घोड्यांना गोळ्या घालते, असे अनेक लोक म्हणताना तुम्ही ऐकलं असेल.
- इंटरनेटवरील अनेक रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, कुत्र्यांची सेवा संपल्यानंतर त्यांना मारले जाते.
- लष्कराच्या या वागणुकीबाबत अनेक प्रकारचे आरोपही केले जातात. याला अमानवी काम देखील म्हटलं जात.
- पण भारतीय लष्कर खरंच कुत्र्यांना गोळी घालत ठार करते का? यामागचं नेमकं सत्य काय आहे, हे आपण या बातमीत जाणून घेणार आहोत….
- Army Dogs: लष्करात कुत्र्यांचीही केली जाते भरती
- भारतीय लष्करातील सैनिकांप्रमाणेच कुत्र्यांचीही भरती करून त्यांना विशेष प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षणात ते बॉम्ब किंवा कोणत्याही स्फोटकांचा वास घेण्यासाठी तयार केले जातात.
- लष्करात प्रामुख्याने लॅब्राडोर, जर्मन शेफर्ड, बेल्जियन शेफर्ड जातीच्या कुत्र्यांची भरती केली जाते.
- या कुत्र्यांना रँक आणि नावे देखील दिली जातात, तसेच त्यांच्या निवृत्तीवर अनेक विधी देखील फॉलो केले जातात.
- Army Dogs: कुत्र्यांना खरच गोळी घालून ठार केलं जात का…?
- द प्रिंटशी बोलताना लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले की, हे चुकीचे आहे.
- द प्रिंटच्या वृत्तानुसार, लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले की, 2015 मध्ये सरकारच्या मंजुरीनंतर लष्कराने प्राण्यांचं इच्छामरण थांबवले आहे.
- म्हणजेच निवृत्तीनंतर कुत्र्यांना लष्कराकडून गोळ्या घातल्या जात नाहीत. त्यांनी पुढे सांगितले की, इच्छामरण फक्त त्यांनाच दिले जाते ज्यांना असाध्य आजार आहेत.
- Army Dogs: कुत्र्यांना गोळी घालण्याच्या दाव्याचे काय आहे सत्य?
- लष्कराच्या कुत्र्यांना गोळ्या घालण्याच्या दाव्यामागे असे म्हटले जाते की, भारतीय लष्कराने देशाच्या सुरक्षेचा विचार करून हे करते.
- निवृत्तीनंतर कुत्रा चुकीच्या हातात पडला तर खूप अडचण निर्माण होऊ शकते, अशी भीती लष्करातील जवानांना असायची.
- त्यांचा कोणी गैरवापर करू नये, म्हणून या कुत्र्यांना गोळ्या घातल्या जातात. यासोबतच लष्कराच्या सुरक्षित आणि गुप्तचर तळांची संपूर्ण माहिती कुत्र्यांकडे असल्याचेही सांगण्यात येत आहे.
- Army Dogs: निवृत्तीनंतर या कुत्र्यांचे काय होते?
- आता प्रश्न असा आहे की, निवृत्तीनंतर लष्करातील कुत्र्यांचे काय केले जाते..?
- भारतीय लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, सेवानिवृत्तीनंतर या कुत्र्यांना मेरठ (कुत्र्यांसाठी) आणि उत्तराखंडमधील हेमपूर (घोड्यांसाठी) वृद्धाश्रमात पाठवले जाते.
- जिथे त्यांची विशेष काळजी घेतली जाते आणि त्यांना राहण्यासाठी जागा दिली जाते.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space