
हुतात्मा दिनानिमित्त बजरंग दल यवतमाळ ग्रामीण प्रखंडतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन.
- प्रतिनिधी : सचिन कोयरे :- हुतात्मा दिनानिमित्त सामा जिक बांधिलकी जपत बजरंग दल यवतमाळ ग्रामीण प्र खंड बजरंग दल तर्फे वडगाव(पोलीस स्टेशन)येथील ला लाजी मेडिकल बस स्टँड चौकात रक्तदान शिबिराचे रवि वार दिनांक २ नोव्हें. रोजी आयोजन करण्यात आले.

- या शिबिराला युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून या शिबिरात तब्बल ७५ रक्तदात्यानी रक्तदान केले. शिबिराचे उद्घाटन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
- प्रारंभी हुतात्म्यांना अभिवादन करून त्यांना श्रद्धांजली वा हण्यात आली. त्यानंतर रक्तदान शिबिरास सुरुवात झाली.
- या प्रासंगिक अनेक तरुणांनी स्वेच्छेने रक्तदान करून समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडली.
- बजरंग दलाचे पदाधिकारी, स्वयंसेवक आणि स्थानिक ना गरिक यांची शिबिरात उपस्थिती होती. रक्तदान शिबिराचे आयोजन यशस्वी करण्यासाठी बजरंग दल यवतमाळ ग्रा मीण प्रखंड बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

- हा उपक्रम समाजसेवेचा संदेश देणारा ठरला असून हुता त्म्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्याचा अर्थपूर्ण प्रयत्न झाला,असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











