
ओझर येथे सार्वजनिक गणेशोत्सवा निमित्त दि. ५ सप्टेंबर रोजी जाकडी नृत्याचा जंगी सामना.
- प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :-तालुक्यातील मौजे ओझर गावातील श्री जय गणेश नवतरुण मंडळ यांच्या व तीने सार्वजनिक गणेशोत्सव २०२५ निमित्त श्री सत्यनारा यण महापूजा आयोजित करण्यात आली.

- असून त्या निमित्ताने शुक्रवार दि ५ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री १०.०० वाजता कलगीवाले शाहीर विनोद फटकारे (मढाळ) ता. गुहागर विरुद्ध प्रसिद्ध तुरेवाले शाहीर, कॅसेट किंग विकास लांबोरे (विवली) केळंबे ता.लांजा या दोन्ही शाहिरांच्या जुगलबंदीचे आयोजन करण्यात आले.
- सार्वजनिक गणेशोत्सवाचे औचित्य साधून ओझर गणेश प्रांगण,वाघु दुकान शेजारी ओझर येथे होणाऱ्या या कार्य क्रमाला पंचक्रोशीतील रसिक प्रेक्षकांनी उपस्थित राहून सामन्याचा आस्वाद घ्यावा असे आवाहन श्री जय गणेश नवतरुण मंडळ ओझर यांनी केले आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











